शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
3
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
4
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
5
Mumbai: मुंबईतील पायधूनी परिसरात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
7
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
8
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
9
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
10
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
11
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
12
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
13
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
14
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
15
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
16
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
17
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
18
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
19
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
20
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण दलाच्या जमिनीवरील बेकायदा झोपड्यांचा पुनर्विकास

By admin | Updated: December 24, 2014 01:58 IST

यामुळे गोळीबार नगर तसेच कुलाबा, कांदिवली येथील सुमारे एक लाख झोपडपट्टीवासीयांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.

नागपूर : मुंबईतील संरक्षण दलाच्या जमिनीवरील बेकायदा झोपड्यांचा पुनर्विकास करण्यास केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.मुंबईतील भाजपाच्या आमदारांची मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक घेतली. त्यात पर्रीकर व खा. पूनम महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत संरक्षण दलाच्या जमिनीवरही झोपडपट्टी पुनर्विकास योजना राबवण्याचा निर्णय झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यामुळे गोळीबार नगर तसेच कुलाबा, कांदिवली येथील सुमारे एक लाख झोपडपट्टीवासीयांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटणार आहे.बिल्डरकडून प्रिमीयम वसूल करायचा की आणखी कसे, यावरून मुंबईतील म्हाडाचे ५६ ले-आऊट रखडले होते. आता दोन्ही पर्याय बिल्डरला देऊन विकासाचा निर्णय घेतल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. सफाई कामगार व पोलिसांना मुंबईत मालकी हक्काने घरे देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.म्हाडा व महापालिकेच्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकास प्रकल्पात ९६ योजनेत अ‍ॅनेक्श्चर-२ देण्यास स्थगिती दिली होती. आता ही स्थगिती आपल्या सरकारने उठवल्याचे शेलार यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)