लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 05:08 IST2026-03-06T05:08:16+5:302026-03-06T05:08:25+5:30

राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवले असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उपचारांचा लाभही देण्यात येत आहेत.

Red card holders should not marry a person with a yellow or red card; ‘Sickle Cell Free Maharashtra’ campaign gains momentum | लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग

लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये; ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : राज्यात सिकलसेल या आनुवंशिक आजाराविरोधात सुरू असलेल्या ‘सिकलसेलमुक्त महाराष्ट्र’ अभियानाला वेग देण्यात आला आहे. आतापर्यंत ७० लाखपैकी ५९.६२ लाख नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. 

या मोहिमेत सिकलसेल रुग्णांना लाल कार्ड, वाहकांना पिवळे कार्ड आणि सामान्य व्यक्तींना पांढरे कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली असून लाल कार्डधारकांनी पिवळे किंवा लाल कार्ड असणाऱ्या व्यक्तीसोबत लग्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सिकलसेलचा प्रसार रोखण्यासाठी विवाहपूर्व जनजागृतीही करण्यात येत आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद आ. उमा खापरे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आबिटकर म्हणाले की, सिकलसेलमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी मिशन मोडमध्ये काम सुरू केले आहे. नागपूर अधिवेशनादरम्यान आमदारांसोबत बैठक घेऊन स्वतंत्र टास्क फोर्स स्थापन केली असून त्याअंतर्गत ‘अरुणोदय’ अभियान राबविण्यात येत आहे.

७३.८४ लाख नागरिक तपासणीचे उद्दिष्ट
१५ जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या या मोहिमेत ० ते ४० वयोगटातील ७३.८४ लाख नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत ५९.६२ लाख व्यक्तींची तपासणी पूर्ण झाली आहे.  त्यामध्ये १,७१४ सिकलसेल रुग्ण आणि २८,३९८ सिकलसेल वाहक आढळले आहेत..

७० लाख जणांचे स्क्रीनिंग
राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये सुमारे ७० लाख नागरिकांचे स्क्रीनिंग करण्याचे लक्ष्य ठेवले असून आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच उपचारांचा लाभही देण्यात येत आहेत.

Web Title : सिकलसेल मुक्त महाराष्ट्र: लाल कार्ड धारक आपस में विवाह न करें।

Web Summary : महाराष्ट्र में सिकलसेल मुक्त अभियान तेज़ हुआ। लाल कार्ड धारकों (रोगियों) से पीले/लाल कार्ड धारकों (वाहकों/रोगियों) से विवाह न करने का आग्रह किया गया है। 73.84 लाख के लक्ष्य में से 59.62 लाख नागरिकों की जांच की गई।

Web Title : Sikkelcell-free Maharashtra: Red card holders should not marry each other.

Web Summary : Maharashtra accelerates its sickle cell-free campaign. Red card holders (patients) are urged not to marry those with yellow/red cards (carriers/patients) to prevent transmission. 59.62 lakh citizens screened out of 73.84 lakh targetted.

टॅग्स :marriageलग्न