शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
3
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
4
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
5
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
6
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
7
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
8
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
9
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
10
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
11
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
12
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
13
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
14
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
15
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
16
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
17
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
18
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
19
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
20
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान

राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 10:19 IST

काही महाविद्यालयांनी पुस्तके-उपकरणांची बनावट बिले दाखवली, काही प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले.

मुंबई - नियमांची सर्रास पायमल्ली करणाऱ्या राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा डी. फार्मसीची ७१ महाविद्यालये आणि बी. फार्मसीच्या १८ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नसून त्याचा निर्णय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. 

फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाच्या  शिफारशी केल्यानंतर हा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ  आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने केलेल्या तपासणीत या कॉलेजांनी वारंवार उल्लंघन केल्याचे समोर आले होते. त्यानंतर शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याची शिफारस राज्य सरकारने पीसीआयकडे केली होती. त्या अनुषंगाने  परिपत्रक काढून या संस्थांना शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी करण्यास बंदी घातली. 

ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि सोलापूर महाविद्यालयांचा समावेश ठाणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील नामांकित महाविद्यालये या यादीत आहेत. शाहापूरमधील एका फार्मसीने पायाभूत सुविधांची माहिती दिली नाही, तर उल्हासनगरातील एका महाविद्यालयाने अग्निसुरक्षा कागदपत्रेच सादर केली नाहीत. अनेक संस्था अपूर्ण किंवा भाड्याच्या इमारतीत सुरू आहेत. काही महाविद्यालयांनी पुस्तके-उपकरणांची बनावट बिले दाखवली, काही प्रयोगशाळा केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे उघड झाले. नाशिक व छत्रपती संभाजीनगरमधील काही संस्थांनी जिओटॅग फोटो पुरावा म्हणून दिले. मात्र, ते अपुरे ठरले.

महाविद्यालयांमध्ये या आढळल्या त्रुटी अग्निसुरक्षा प्रमाणपत्र, इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्रांचा अभाव, अपुऱ्या प्रयोगशाळा, अपूर्ण पायाभूत सुविधा, पात्र प्राध्यापकांची कमतरता आणि पात्र प्राचार्य नसणे आदी अनेक त्रुटी होत्या. त्यातून अनेक कॉलेजेस गुणवत्ता नसताना केवळ नावाला सुरू होती. 

अनेक काॅलेज विद्यार्थ्यांपासून वंचितराज्यात गेल्या काही वर्षांत फार्मसी अभ्यासक्रमाची महाविद्यालये भरमसाट वाढली होती. त्यामुळे फार्मसी कॉलेजांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. तसेच अनेक कॉलेजांना विद्यार्थीही मिळू शकले नव्हते. त्यामुळे भरमसाट वाढलेल्या महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेचाही अभाव होता. त्यामुळे त्यांच्यावर चाप आणण्याची मागणी होत होती.

असोसिएशन ऑफ फार्मास्युटिकल टीचर्स ऑफ इंडियाने अनेकदा गरजेपेक्षा जास्त महाविद्यालयांना परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. शैक्षणिक गुणवत्तेचे रक्षण करण्यासाठी सरकार, तंत्र शिक्षण संचालनालय आणि विद्यापीठांनी महाविद्यालयांची नियमित संयुक्त तपासणी करायला हवी.- प्रा. मिलिंद उमेकर, अध्यक्ष, इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेस असोसिएशन

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Cancels Recognition of 89 Pharmacy Colleges for Violations

Web Summary : Maharashtra's technical education department revoked recognition for 89 pharmacy colleges. Violations included inadequate facilities, missing documents, and fake records. D.Pharm and B.Pharm admissions are now barred for these colleges, following PCI recommendations to ensure quality.
टॅग्स :collegeमहाविद्यालय