राऊतांनी काँग्रेसला खूश करण्यासाठी ज्ञान पाझळू नये, सेनेत जेवढे आमदार त्याहून अधिक दलित खासदार भाजपत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 15:13 IST2022-01-18T15:09:51+5:302022-01-18T15:13:18+5:30
आमचं तुमच्या पक्षासारखा दिखावा आणि देखाव्यासारखं प्रेम नसतं, म्हणूनच पंतप्रधान मोदींनी नुसता आदर दाखवण्यापूरता केला नाही, तर समान संधी व प्रतिनिधीत्वाचा हक्क भारतीय जनता पक्षाने खासदार म्हणूनही दिला आहे, असेही राऊत म्हणाले.

राऊतांनी काँग्रेसला खूश करण्यासाठी ज्ञान पाझळू नये, सेनेत जेवढे आमदार त्याहून अधिक दलित खासदार भाजपत
संजय राऊंताच्या पक्षात (शिवसेनेत) जेवढ्या आमदारांची संख्या आहे, त्याहून अधिक दलित बांधव, खासदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर निवडून आले आहेत. आमच्या जे पोटात, तेच ओठात आहे आणि तेच आमच्या कृतीतही आहे. यामुळे संजय राऊतांनी (Sanjay Raut) काँग्रेसला खूश करण्यासाठी आम्हाला ज्ञान पाझळू नये. असा टोला भाजप आमदार राम सातपुते (MLA Ram Satpute) यांनी राऊतांना लगावला आहे. एवढेच नाही, तर तुमच्या पक्षाने किती जणांना प्रतिनिधित्व दिले ते जाहीर करा, असे आवाहनही सातपुते यांनी राऊतांना यावेळी दिले.
सातपुते म्हणाले, संजय राऊतांनी काल नेहमी प्रमाणे आपला तोंडपट्टा चालवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दलीत बांधवाचे पाय धुतले, याचा संदर्भ देत टिका केली, भारतीय जनता पार्टीला उत्तर प्रदेशात सर्वच समाजाचा मिळणारा प्रतिसाद व विश्वास पाहता यांच्या पायाखालची जमिन सरकली आहे. पण संजय राऊतांनी दलितांच्या, शोषितांच्या प्रश्नावर भारतीय जनता पार्टीला शहाणपणा शिकवण्याची गरज नाही.