शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

खोतकरांसोबतचा वाद मिटता मिटेना; दानवे आज मातोश्रीवर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 9:15 AM

शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती.

मुंबई : शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शड्डू ठोकले आहेत. युती होण्याआधी दानवेंविरोधात लोकसभा लढण्याची घोषणा केली होती. मात्र, युतीनंतर दानवेंनी सहकारमंत्री सुभाष देशमुखांसोबत खोतकरांच्या घरी जात वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याची शक्यता आहे. मात्र, दानवेंना गेल्या वेळी मातोश्रीबाहेर झालेला विरोध पाहता शिवसैनिकांची युतीनंतरची भूमिका पाहावी लागणार आहे. 

जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे यांनी गेल्या विधानसभेला युती तुटल्यानंतर शिवसेनेच्या नेतृत्वावर जहरी टीका केली होती. यामुळे नाराज झालेल्या आमदार खोतकरांनी दानवेंना लोकसभेला पराभूत करण्याचा विडा उचलला होता. युती झाली तरीही अपक्ष लढण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, युती झाल्याने खोतकरांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करत रावसाहेब दानवेंबरोबर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना सोमवारी पाठविले होते. यावेळी या तिघांची पाऊण तास बंद दाराआड चर्चा झाली. 

यावेळी पत्रकारांशी बोलतांना सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले की, खोतकर आणि दानवे यांच्यात तात्वीक मतभेद होते. परंतु, ते आता निवळले असून, मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत खोतकर, दानवे यांची चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले होते. यानुसार खोतकरांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. मात्र, या बैठकीत तिढा न सुटल्याने रावसाहेब दानवे आज मातोश्रीवर जाणार आहेत. 

अर्जुन खोतकर यांनी आपण अद्यापही मैदानात असल्याचे सांगून माझ्या संदर्भातील निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हेच घेणार आहेत, त्यांनी घेतलेला निर्णय आपल्यासाठी अतिंम निर्णय राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, रावसाहेब दानवे यांनी गेल्या पाच वर्षांत शिवसेनेविरोधात केलेली वक्तव्ये पाहता काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या मातोश्री भेटीवेळी शिवसैनिकांनी कडवा विरोध केला होता. यामुळे दानवे आणि मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांना रस्त्यातूनच माघारी जावे लागले होते. या पार्श्वभुमीवर आज दानवेंबाबत शिवसैनिक कोणती भूमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

वादाचा इतिहास काय?जालना बाजार समितीच्या निवडणुकीत संचालकपदाच्या जास्त जागा भाजपने मागितल्या होत्या. त्या देण्यावरून खोतकर आणि दानवे यांच्यात रस्सीखेच झाली होती. शेवटी तीन जागा शिवसेनेने भाजपला देतानाच खा. रावसाहेब दानवे यांचे चुलतबंधू भास्कर दानवे यांना उपसभापतीपद दिले. हा वाद मिटतो न मिटतो तोच २०१६ मध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात भाजपला सर्वाधिक २२, तर शिवसेनेला १५ जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी भाजपसोबत युती करून जिल्हा परिषद युतीच्या ताब्यात ठेवावी असा आग्रह दानवे यांनी धरला होता. तो फेटाळून लावत अर्जुन खोतकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून जिल्हा परिषदेत चुलत भाऊ अनिरुद्ध खोतकर यांना अध्यक्षपदी विराजमान केले. उपाध्यक्षपदही राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सतीश टोपे यांच्याकडे दिल्याने दानवे आणि खोतकरांमधील दरी वाढत गेली. त्यातच लोकसभा निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच खोतकर यांनी दानवे यांच्याशी दोन हात करण्याचा निर्णय जाहीर केल्यावर तर दानवे-खोतकर हा वाद आणखी गडद होत गेला. 

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेArjun Khotkarअर्जुन खोतकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना