नागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी', राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 17:50 IST2022-10-16T17:49:58+5:302022-10-16T17:50:31+5:30
NCP slams Devendra Fadnavis: मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.

नागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी', राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीसांना लगावला टोला
मुंबई - देवेंद्र फडणवीस यांच्या होमग्राऊंड असलेल्या नागपूरमधील 'रस्त्यांची रांगोळी' म्हणत राष्ट्रवादीने ट्वीटरवर एक फोटो शेअर करून देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर पेजवर नागपूरमधील खड्ड्यांची दुरावस्था झालेला एक फोटो शेअर करुन मुंबईच्या खड्ड्यांची चर्चा करता मग याही खड्डयांबाबत बोला अशी विचारणा करण्यात आली आहे.
मुंबई खड्ड्यांबाबत मुख्यमंत्री योजना जाहीर करतात मग फडणवीसांच्या नागपूरकडे का दुर्लक्ष करता असा सवालही राष्ट्रवादीने ट्वीटच्या माध्यमातून केला आहे.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी योजना जाहीर केली. आता त्यांनी नागपूरकडेही लक्ष द्यावं. नागपूरमधली ही खड्ड्यांची रांगोळी!
— NCP (@NCPspeaks) October 16, 2022
फोटो सौजन्य : @mataonlinepic.twitter.com/JZtzAnl27U