मुंबई : उद्योगमंत्री नारायण राणो यांनी नाशिक येथील शाळा अनधिकृत जाहीर केली असतानाही ती सुरू ठेवण्याचे दिलेले आदेश मागे घेतले जात असल्याची माहिती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी सोमवारी उच्च न्यायालयाला दिली़
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठासमोर ही माहिती देण्यात आली़ ते ग्राह्य धरत न्यायालयाने ही सुनावणी बुधवार्पयत तहकूब केली़
या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव यांनी अॅड़ उदय प्रकाश वारूंजीकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली आह़े नाशिकच्या गंगापूर येथील फ्रावशी इंटरनॅशनल शाळा अनधिकृत असून ती बंद करावी असे आदेश तत्कालीन सचिव अविनाश हजारे यांनी 2क्क्6मध्ये दिले होत़े मात्र त्या वेळी महसूलमंत्री असलेले राणो यांनी हे आदेश रद्द केले, असा आरोप याचिकेत करण्यात आला आह़े त्याची दखल घेत न्यायालयाने याचे प्रत्युत्तर सादर करण्याचे आदेश शासनाला गेल्या सुनावणीत दिले होत़े (प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}