शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी आणि भाजपात मॅच फिक्सिंग; प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 16:45 IST

Loksabha Election 2024: रामटेक मतदारसंघात प्रचार करताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेससह भाजपा आणि महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. 

नागपूर - Prakash Ambedkar on Mahavikas Aghadi ( Marathi News ) महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये मॅच फिक्सिंग झाली आहे. आम्ही पक्ष म्हणून निवडणुकीत उभे आहोत.  शाम मानव, तुषार गांधी आरोप करत आहेत. तुम्हाला वाटतं भाजपा हरली पाहिजे तर काँग्रेसवाल्यांनो रिंगणातून बाहेर पडा. भाजपासोबत दोन हात करून आम्ही मोकळं होवू, तुमच्यासारखे आम्ही भित्रे नाही. आम्ही मोदीची ताकद उखडून टाकायला निघालो आहोत. आम्ही त्यांना उघडे पाडत आहोत. जे तुम्ही करायला पाहिजे ते आम्ही करत आहोत, म्हणून शाम मानव आणि तुषार गांधी यांना मिरच्या झोंबायला लागल्या आहेत अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी टीकाकारांचा समाचार घेतला. 

रामटेक लोकसभा मतदार संघाचे उमेदवार किशोर गजभिये यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते.प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपली चळवळ भक्कम राहिली पाहिजे. काँग्रेसवाले कितीही म्हणाले तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपली आहे. दिल्लीत राहुल गांधी यांनी मॅच फिक्सिंग हा शब्द मोदी आणि निवडणूक आयोगासंदर्भात वापरला होता पण महाविकास आघाडीने तो प्रत्यक्षात महाराष्ट्रात उतरवला आहे. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटानं असा उमेदवार दिलाय की तो श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात लढू शकत नाही अशी कल्याणची माणसं म्हणतायेत. भंडारा-गोंदिया येथेही तेच झाले. काँग्रेसने नांदेडमध्ये चव्हाण नावाचा उमेदवार उभा केला जो आठवड्यातून तीन दिवस डायलेसिसवर असतो, तो तब्येत सांभाळणार की, प्रचार सांभाळणार ? मी अनेक उदाहरणे देऊ शकतो, यांच्या मनात चौकशीची भीती आहे. महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात मॅच फिक्सिंग झाली आहे असा आरोप त्यांनी केला. 

त्याचसोबत नरेंद्र मोदींची दमदाटी करून वसुली करण्याची पद्धत ही गल्लीतल्या दादापेक्षा वेगळी आहे का ? गावात जो वसुली करतो त्यालाही आपण गुंड म्हणतो, काँग्रेसवाल्यांना संधी आली होती, हे उघड करण्याची पण ते भूमिका घ्यायला तयार नाहीत. आम्ही संविधान वाचवणार आहोत आणि म्हणून आम्हाला मतदान द्या असं ते म्हणतायेत, यांचा नुसता बोलाचा भात आणि बोलाची कढी आहे. शेवटी आपल्यालाच लढावे लागणार आहे. रामटेक मतदारसंघातील काँग्रेसचा उमेदवार घ्या, सर्वांना माहिती होते की, त्यांचे जात प्रमाणपत्र टिकणार नाही. तरीही त्याला जबरदस्तीने उमेदवारी दिली आणि उमेदवारी रद्द झाली. त्यानंतर त्यांच्या पतीला उमेदवारी दिली. काँग्रेसचे अनेक नेते चौकशीखाली आहेत. हेरॉल्ड या पेपरला नोटीस आली आणि ८७५ कोटींची संपत्ती जोडली गेलीय त्यामध्ये खरगे हे आरोपी आहेत. त्यामुळे लढण्याची इच्छाच यांच्यामध्ये दिसत नसल्याचेही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अनेक जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते मला विचारतात की, आमच्या नेत्यांना झालंय काय? मी त्यांना म्हणालो की, तिहार जेलचा रोग लागलेला आहे. आपण चिंता करू नका, आपण मिळून लढू, भाजपाची सत्ता आपण घालवू असा जिल्ह्यातील काँग्रेसचा कार्यकर्ता मला निरोप देतोय. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाला हरवायचे ठरवले आहे, मात्र नेत्यांनी त्यांना वाचवायचे ठरवले आहे असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी लगावला.

विशाल पाटील लढले, तर त्यांना पाठिंबा देवू

४ दिवसांपूर्वी प्रतिक पाटील आले आणि म्हणाले की, काय करायचं ? म्हटलं हिंमत असेल, तर लढा. विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू अशी ग्वाही प्रकाश आंबेडकरांनी दिली. सांगलीत काँग्रेसची ताकद आहे. सेना तिथे शून्य आहे. त्याठिकाणी मैत्रीपूर्ण होऊ द्या आम्ही तिथे आमचा उमेदवार उभा करतो असं उद्धव ठाकरेंना म्हणण्याची ताकद काँग्रेसची नाही असंही आंबेडकरांनी सांगितले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरramtek-pcरामटेकcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४