शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रामराजेंचा पुतळा जाळला !

By admin | Updated: April 1, 2015 00:07 IST

साताऱ्यात अकराजण ताब्यात : उदयनराजेंच्या संतप्त समर्थकांची घोषणाबाजी

सातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील शाब्दिक संघर्ष आता थेट रस्त्यावर पोहोचला आहे. रामराजेंनी उदयनराजेंविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेध म्हणून उदयनराजे यांच्या संतप्त समर्थकांनी मंगळवारी रामराजेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे साताऱ्यात दहन केले. याप्रकरणी अकराजणांना ताब्यात घेण्यात आले आणि नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.नीरा-देवघरच्या पाण्याचा प्रश्न घेऊन खासदार उदयनराजे यांनी फलटणमध्ये घेतलेल्या सभेनंतर या दोन नेत्यांमधील संघर्ष पेटण्यास सुरुवात झाली होती. दोघांनीही एकमेकांविरुद्ध भडक विधाने केली होती. ‘उदयनराजेंना लोक डाव्या-उजव्या हाताने मुजरा करत असतील; पण मी मात्र पायानेच मुजरा करेन,’ असे वक्तव्य रामराजेंनी केले होते. त्यामुळे उदयनराजे समर्थक कमालीचे संतप्त झाले. सातारच्या पोवई नाक्यावर दुपारी तीन वाजल्यापासून कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आधीपासूनच मोठा बंदोबस्त तैनात केला होता. साडेतीन वाजता कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. प्रतीकात्मक पुतळा जाळण्याच्या कार्यकर्त्यांच्या योजनेची पोलिसांना कुणकूण होती. त्यामुळे अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते.काही कार्यकर्त्यांनी पोलिसांची नजर चुकवून प्रतीकात्मक पुतळा पेटविला, तेव्हा मोठी धावपळ उडाली. पोलिसांनी पुतळा पेटविणाऱ्यांच्या दिशेने धाव घेतली. घोषणाबाजी करणारे कार्यकर्तेही त्या दिशेने धावले. पोलिसांनी तातडीने कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली. यावेळी अकराजणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुमारे साडेसहा वाजता त्यांची जामिनावर सुटका झाली. (प्रतिनिधी) (संबंधित वृत्त ३)गनिमी कावा अन् अपशब्दआंदोलकांनी घोषणाबाजी करत सिग्नलच्या दिशेने येण्यास सुरुवात केली, तेव्हा पोलिसांचे लक्ष त्यांच्याकडे केंद्रित झाले. तेवढ्यात एका गटाने अजिंक्य कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ रामराजेंचा प्रतीकात्मक पुतळा पेटविला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. रामराजेंना ‘सरदारांनी छत्रपतींबद्दल तोंड सांभाळून बोलावे,’ असा इशारा आंदोलक वारंवार देत होते. पोलिसांनी पकडल्यावर व्हॅनमध्ये बसूनही आंदोलकांनी अपशब्दांचा मुक्त वापर केला.