शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यातून १ कोटी सह्या घेणार, काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा उघड करू”: CM देवेंद्र फडणवीस
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
कियाने पुन्हा लाँच केली न खपणारी कार, गेल्या महिन्यात ५९ पण विकल्या नव्हत्या, ५०० चा आकडा गाठतानाही...
4
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
5
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
6
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
7
लेकीला कडेवर घेऊन पाऊण तास उभा, १०० रिक्षांना हात दाखवला तरीही...; डोंबिवलीतील व्हिडीओ व्हायरल
8
हैवान! पित्याने आपल्या ७ मुलांना झोपेतच संपवलं, चार मुलं स्वत:च्या पत्नीपासून तर तीन मुलं...
9
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
10
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
11
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?
12
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
13
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
14
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
15
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
16
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
17
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
18
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
19
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
20
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
Daily Top 2Weekly Top 5

माहूरच्या रामगड किल्ल्यात युगुलाची गळा चिरून हत्या

By admin | Updated: September 12, 2014 00:53 IST

नांदेड-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील माहूरच्या ऐतिहासिक रामगड किल्ल्यात युगुलाची गळा चिरून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.

माहूर : नांदेड-यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील माहूरच्या ऐतिहासिक रामगड किल्ल्यात युगुलाची गळा चिरून आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.दोघेही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असून तरुणी यवतमाळ जिल्ह्यातील पुसदची तर तरुण उमरखेडचा आहे. हत्या नेमकी कशासाठी झाली, हे मात्र कळू शकले नाही. शाहरुख खान फिरोज खान पठाण (२३) रा. जाकीरहुसेन वॉर्ड उमरखेड जि. यवतमाळ आणि निलोफर मारिया खालीद बेग मिर्झा (२०) रा. दुधे ले-आऊट गांधीनगर पुसद अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी रामगड किल्ल्यातील बारुदखान्याजवळ या दोघांचेही मृतदेह आढळून आले. शाहरुखच्या डोक्यावर चार घाव आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळून आले, तर निलोफरच्या उजव्या डोळ्यावर व डोक्यात तीक्ष्ण हत्याराने आरपार घाव घातल्याचे दिसून आले. निलोफर ही पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन शाखेत तृतीय वर्षात शिकत होती, तर शाहरुख याने पुसद येथील डॉ. एन.पी. हिराणी तंत्र निकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका घेतली. त्यानंतर त्याने यवतमाळच्या जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला होता. हे दोघे १० सप्टेंबर रोजी इंडिका व्हिस्टा कार क्र. एम.एच.२९-३७७० ने पुसदवरून दुपारी १२ वाजता माहूरला आले. रामगड किल्ला पाहण्यासाठी ते किल्ल्यावर गेले. मात्र परतच आले नाही. इकडे या दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांचा शोध चालविला होता. घटनेची माहूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. दरम्यान गुरुवारी सकाळी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय कांबळे, पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, जगदीश गिरी, अनिल जाधव, प्रियंका वासनिक यांनी रामगड किल्ल्यात शोध मोहीम राबविली. त्यावेळी दोघांचेही मृतदेह आढळून आले. दोघांचीही प्रेते येथील रुग्णालयात आणून शवविच्छेदन करण्यात आले. रामगड किल्ल्यावर आणि रुग्णालयासमोर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. नेमकी हत्या कुणी आणि कशासाठी केली, हे मात्र कळू शकले नाही. परंतु या दोघांच्या मागावर तीन अनोळखी इसम असल्याची चर्चा माहूरमध्ये आहे. (वार्ताहर)