शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

फेरीवाल्यांविरुद्ध लढण्यापेक्षा सीमेवर जाऊन लढा, रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2017 22:46 IST

मनसेने ठाणे व कल्याणमधील फेरीवाल्यांना मारहाण करत पिटाळून लावल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत मराठ्यांचा हक्क कमी होतोय म्हणून त्यातील परप्रांतियांना कुणीही हाकलू शकत नसल्याचे विधान केले आहे. 

मीरा रोड  - ''गोरगरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत त्यांच्यावर हल्ला करण्यापेक्षा मनसैनिकांनी लष्करात जाऊन सीमेवर्ती  देशाच्या दुष्मनांशी लढावे .  गरीब फेरीवाल्यांवर, हल्ला झाला तर भीमसैनिक  मनसैनिकांना  चोख उत्तर देतील'', असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष  व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दिला आहे. 

मीरा रोड येथील हॉटेल सनशाईन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते  बोलत होते.  फेरीवाल्यांमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल त्यांच्याबद्दलची तक्रार पोलीस आणि प्रशासनाला करता येऊ शकते . त्यांच्यावर प्रशासन कारवाई करेल मात्र  मनसेने  कायदा हातात घेऊ नये. मनसैनिकांनी गरीब फेरीवाल्यांवर दादागिरी करीत हल्ले करू नयेत. फेरीवाल्यांवर ज्या मन सैनिकांनी हल्ले केलेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, असे सांगत  गरीब फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी भीमसैनिक आणि रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील असा इशाराही रामदास आठवले यांनी दिला आहे . 

सामान्य जनतेतील 70 टक्के लोक फेरीवाल्यांकडूनच वस्तू घेतात . सरकारने ही फेरीवाल्यांवबद्दल निश्चित धोरण ठरविले पाहिजे . दिल्लीत फेरीवाल्यांना मान्यता आहे. तशीच सन 2014 च्या निवडणुकीत मतदान केलेल्यांच्या झोपड्या पत्र ठरवाव्यात यामागणीप्रमाणेच सन  2014 पर्यंतचे फेरीवाले अधिकृत करण्यात यावे अशी रिपाइंची मागणी असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

भाजपा शिवसेनेने वाद करू नये आगामी निवडणुकांमध्ये भाजपा शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक लढावी असा सल्लाही रामदास आठवलेंनी  दोन्ही पक्षांना दिला. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत रिपाइं युती होणार असून जास्तीत जास्त दलित मतदान भाजपाला मिळवून देण्यासाठी  रिपाइं भाजप सोबत राहील असे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितले . 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMNSमनसे