शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

रामदास अठावलेंचं गृहमंत्री अमित शाहंना पत्र, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवाट लावण्याची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2021 4:20 PM

परमबीर सिंग यांचे पत्र आज थेट संसदेत पोहोचले. याच मुद्द्यावर आज शरद पवार यांनीही पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतली.

मुंबई : परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्याचे राजकीय वातावरण जबरदस्त तापले आहे. यातच आता भाजपचा सहकारी पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष रामदास अठावले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून, महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा विचार करत येथे राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली असल्याने, ही मागणी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

सचिन वाझे प्रकरणावरून आणि त्यानंतर परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बवरून विरोधी पक्ष सरकारवर दबाव टाकत आहे. मात्र, सरकारने अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. एनसीपीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले, "परमबीर सिंग यांचे पत्र तथ्यहीन आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात ५ ते १५ तारखेपर्यंत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होते. यानंतर १५ फेब्रुवारी रोजी डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते १५ ते २७ फेब्रुवारी दरम्यान नागपुरात राहत्या घरी क्वारंटाईन होते. यामुळे परमबीर सिंग यांनी केलेले आरोप आणि वस्तुस्थिती यात मोठी तफावत आहे. अनिल देशमुख फेब्रुवारी महिन्यात कुणाला भेटण्याची शक्यताच नव्हती. हे सिद्ध झाले आहे". मात्र, पवारांचा हा दावा खोडून काढत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी एक व्हिडीओ शेअर करत १५ फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतल्याचे म्हटले आहे.

त्या पत्रकार परिषदेबाबत अनिल देशमुख बोलले - त्या पत्रकार परिषदेवरून झालेल्या आरोपांना उत्तर देताना अनिल देशमुख म्हणाले, कोरोनाचे निदान झाल्यानंतर मी ५ ते १५ फेब्रुवारीदरम्यान नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होतो. तिथून १५ फेब्रुवारीला डिस्चार्ज झाला. मी रुग्णालयातून बाहेर पडत असताना तिथे रुग्णालयाच्या गेटवर काही पत्रकार उपस्थित होते. मात्र मला कोविडमुळे थकवा आला होता. माझ्या अंगात त्राण नव्हते. त्यामुळे तिथेच खूर्चीवर बसून प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर मी १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान होम क्वारेंटाइन होतो. पुढे २८ तारखेला मी पहिल्यांदा घराबाहेर पडलो. तत्पूर्वी, परमबीर सिंग यांचे पत्र आज थेट संसदेतही पोहोचले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेAmit Shahअमित शहाSharad Pawarशरद पवारParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुख