आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 04:53 PM2019-03-24T16:53:50+5:302019-03-24T17:13:48+5:30

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी आठवलेंनी वारंवार केली होती. मात्र, युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता.

Ramdas Athavale will support Shivsena's Rahul Shewale | आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले

आठवलेंचे बंड शमले; राज्यसभेच्या आश्वासनावर नमले

googlenewsNext

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करताना मित्रपक्षांना बाजुला केल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंसह मित्रपक्ष नाराज झाले होते. आठवले यांनी आरपीआयसाठी दक्षिण मध्य मुंबईची जागा मागितली होती. मात्र, भाजपाने ही जागा शिवसेनेला सोडत राहुल शेवाळे यांची उमेदवारी जाहीर झाली होती. आज शेवाळे यांनी आठवलेंच्या कार्यालयात जात भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी राज्यसभेसाठी आश्वस्त केल्याने आठवलेंनी माघार घेतल्याचे जाहीर केले. 


दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघ आपल्यासाठी सोडावा अशी मागणी आठवलेंनी वारंवार केली होती. मात्र, युतीच्या बोलणीत हा मतदारसंघ शिवसेनेला गेला होता. या जागेवर शिवसेनेने राहुल शेवाऴेंचे नाव जाहीर केले आहे. यामुळे मित्रपक्षांना जागाच न दिल्याने महादेव जानकरांसह आठवले गटही नाराज झाला होता. आठवलेंनी दक्षिण मध्य मुंबईची जागा लढविण्याचा विचार केला होता. दक्षिण मध्य मुंबईत यापूर्वी मी जिंकलो होतो. 2014 मध्ये भाजपासह मित्रपक्षांशी यासंदर्भात चर्चाही झाली होती. यामुळे मी या जागेसाठी दावेदार होतो. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शनिवारी चर्चा करत राज्यसभेची जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच कॅबिनेट मंत्रीपद मिळावे अशी मागणीही केल्याचे आठवले यांनी सांगितले. 


यामुळे आज शिवसेनेचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आठवलेंची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी आठवले यांनी राहुल शेवाळे यांना पाठिंबा जाहीर केला. शेवाळे चांगले मित्र आहेत. त्यांच्या प्रचारासाठी काम करू, असे आठवले यांनी सांगितले.
तर शेवाळे यांनीही त्यांच्या ट्विटरवर आठवलेंसोबच्या भेटीचा फोटो टाकला आहे. 



 

Web Title: Ramdas Athavale will support Shivsena's Rahul Shewale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.