शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

मुंबई काँग्रेसच्या कार्यक्रमात राम मंदिराची मागणी

By admin | Updated: July 3, 2017 05:14 IST

मुंबई काँग्रेसच्या संत, मंहत सेलच्या पहिल्याच कार्यक्रमात रविवारी ‘जय श्रीराम’चा नारा घुमला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई काँग्रेसच्या संत, मंहत सेलच्या पहिल्याच कार्यक्रमात रविवारी ‘जय श्रीराम’चा नारा घुमला. पक्षाचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीतच अयोध्येत राम मंदिर उभारण्याची आग्रही मागणी ध्यानयोगी ओमदासजी महाराज यांनी केली. तर, स्वत: निरुपम यांनी मी कट्टर हिंदू आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठीच मुंबई संत-महंत काँग्रेसची स्थापना करण्यात आल्याचे सांगत काँग्रेसजनांनाच धक्का दिला.संजय निरुपम यांच्या पुढाकाराने अलीकडेच मुंबई काँग्रेसच्या संत-महंत सेलची स्थापना करण्यात आली. ध्यानयोगी ओमदासजी महाराज यांच्याकडे या सेलचे अध्यक्षपद सोपविण्यात आले. काँग्रेसच्या या संत-महंत सेलचा पहिला कार्यक्रम रविवारी सांताक्रूझ येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आला होता. मुंबईमधील छोट्यामोठ्या मंदिरांच्या पुजाऱ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मात्र, मोठे साधू अथवा संत, महंत या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. यावेळी बोलताना ओमदासजी महाराज म्हणाले की, ज्या प्रमाणे मुस्लिमांसाठी मक्का आणि ख्रिश्चनांसाठी रोम पवित्र भूमी आहे तशी हिंदूंसाठी अयोध्या आहे. अयोध्या रामजन्मभूमी असून तिथे प्रभू रामाचे भव्य मंदिर व्हायला हवे. दिवंगत राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राम मंदिराचे दरवाजे उघडले होते. वर्षानुवर्षे कुलुपबंद असणारे प्रभू रामांचे दर्शन त्यांच्यामुळे झाले. ओमदासजी महाराज यांच्याप्रमाणे निरुपम यांनी थेट राम मंदिराची मागणी केली नाही. मात्र, आपण स्वत: कट्टर हिंदू आहोत. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या नावाखाली होणाऱ्या अपप्रचाराला आळा घालण्यासाठी संत-महंत सेलची स्थापना केल्याचे सांगितले. भाजपा सरकारच्या गोहत्या विरोधी कायद्याला आमचा विरोध नाही. पण, याचा अर्थ कोणीही कायदा हातात घ्यावा असा होत नाही. रस्त्यात गायीवरून लोकांना मारहाण होता कामा नये. गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याप्रमाणेच शिक्षा व्हायला हवी. सर्व धर्मांना समान सन्मान मिळायला हवा, ही काँग्रेस पक्षाची विचारसरणी आहे, असे निरुपम म्हणाले. गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस हा हिंदू धर्मविरोधी, हिंदूविरोधी पक्ष आहे अशी इतर पक्षांनी चुकीची प्रतिमा बनवली आहे. काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. महात्मा गांधी धर्मनिरपेक्ष ्नहोते. पण तेही आपल्या सभेची सुरुवात रघुपती राघव राजाराम या भजनाने करत. यावेळी ओमदासजी महाराज यांच्यासह महंतश्री रामसेवक दासजी महाराज- ओंकारेश्वर, महंतश्री हरदेवदासजी महाराज, महंतश्री राजेंद्रप्रसाद पांडे, जयप्रकाश सिंह आदी उपस्थित होते.