शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते; पक्ष मला 6 वर्षांसाठी निलंबित करू शकतो - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 00:07 IST

आव्हाड म्हणाले, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे.

मुंबई –  आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीवेळी (Rajya sabha election) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी नियमबाह्य मतदान केल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. यासंदर्भातील भाजप आमदारांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सविस्तर पत्र देत, आव्हाडांचे मत बाद करण्यात यावे, अशी मागणीही केली आहे. यानंतर आता, जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. आपण राज्यसभेसाठी मतदान (Voting for Rajya sabha election) करताना कोणतीही चूक केली नाही. मतदान करताना जी प्रक्रिया करावी लागते, तीच प्रक्रिया आपण केली आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

आव्हाड म्हणाले, मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, तसे केले नाही तर पक्षाचे सदस्यत्व रद्द होऊ शकते, पक्ष कारवाई करू शकतो. दुर्दैवाने संपूर्ण महाराष्ट्रला वेठीस धरून, मोठा संभ्रम निर्माण करून, गैरसमज पसरत असतील तर, त्याचा स्पष्ट खुलासा करण्यासाठी मी येथे आलो आहे.  काय म्हणाले आव्हाड, कसं केलं मतदान? -आव्हाड म्हणाले, "मी साधारणपणे बारा साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचलो. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो. तेथून मला जे सांगण्यात आले. ते ऐकूण मी मतदानासाठी गेलो. मतदान केल्यानंतर मी ते माझ्या पक्षांच्या एजंटना दाखवले. तेव्हा कागद माझ्या छातीवर होता, कॅमेरा माझ्या मागे होता. त्यावेळी मी थोडा हसलो. त्याला वेगळे कारण होते. यानंतर मतपत्रिका बंद करून मी बाहेर आलो, मतदान पेटीकडे गोलो, मतदान टाकले आणि बाहेर निघून गेलो. 

यानंतर मी गेटवर आलो. तोवर माझ्यावर कसल्याही प्रकारचे ऑब्जेक्शन घेण्यात आलेले नव्हते. यानंतर मला माध्यमांकडून समजले, की माझ्यावर ऑब्जेक्शन घेण्यात आले आहे. मात्र, यासंपूर्ण प्रक्रियेत माझ्याकडून काही चूक झाल्याचे मला तरी वाटत नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले आहे.

...तर माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते -उगाच महाराष्ट्रासमोर असे जायला नको, की आम्ही काही वेगळे केले आहे, काही चुका केल्या आहेत, अजिबात नाही. काही कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत आहेत. माझ्या मते, माझ्याकडून कसलीही चूक झालेली नाही. माझे मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचे असते, नियमाने त्यांना मतदान दाखवले. ते न दाखवल्यास माझा पक्ष मला सहा वर्षांसाठी निंलंबित करू शकतो. माझे पॉलिटिकल करिअर बर्बाद होऊ शकते. मी माझी क्रिया केली. माझ्या माणसाला माझे मतदान दाखवले. पण आता हा संभ्रम निर्माण केला जात आहे. गैरसमज पसरत असतील, तर त्याचा खुलासा करायला मी आलो आहे, असेही जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.  

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा