शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

दूध आंदोलनाला यश, लिटरमागे २५ रुपये दर; मुख्यमंत्री, गडकरींच्या बैठकीत निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 20:00 IST

दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये  दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली.

नागपूर : दूधाच्या दरात वाढ करावी यासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर सरकारने दखल घेतली. दुधाला प्रतिलिटर २५ रुपये  दर देण्याची घोषणा गुरुवारी सरकारतर्फे करण्यात आली. नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या बैठकीत संबंधित निर्णय घेण्यात आला.  २१ जुलैपासून हा निर्णय लागू होणार असून, दूध संघांना आता शेतक-यांना २५ रुपये भाव द्यावा लागणार आहे.  दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी विधानसभेत व राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी विधानपरिषदेत तशी घोषणा केली.दुधाच्या दरात वाढ करण्यात यावी, यासाठी राजू शेट्टींच्या 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'ने राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. या दूध आंदोलनाचा आजचा चौथा दिवस आहे. आंदोलनात दुधाचे टँकर रोखून, जाळपोळही झाली. सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याचे पाहून शेट्टी यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत शेतक-यांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहनही केले होते. राज्यभरातील अशा आंदोलनांची दखल घेत विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या दालनात गुरुवारी दूध दरवाढीसंदर्भात बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, सुरेश धस, राहुल मोटे, राहुल कुल, सतेज पाटील यांच्यासह काही दूध संघाचे प्रतिनिधीही उपस्थित होते.     या बैठकीत दुधाला २५ रुपये दर देण्याचा निर्णय झाला.  राज्य सरकार हे पाच रुपये दूध संघांना देईल आणि दूध संघांकडून हे पाच रुपये शेतकºयांना मिळतील. प्रत्येक दूध संघाला या पाच रुपयांचा लाभ शेतक-यांना देणं बंधनकारक असेल. याची अंमलबजावणी २१ जुलैपासून करावी लागेल. जानकर यांनी विधानसभेत घोषणा केल्यानंतर सदस्यांनी बाका वाजवून निर्णयाचे स्वागत केले.  बैठकीत काय ठरले ? - पिशवी बंद दुधासाठी कोणतेही अनुदान नाही.- पिशवीबंद दूध वगळून दुधाला प्रति लिटर ५ रुपये अनुदान. - अनुदान दूध पुरवठा करणारी संस्था किंवा रूपांतरण करणारी संस्था यापैकी एकालाच मिळेल.- जे दूध भुकटी उत्पादक ५ रुपये प्रति लिटर लाभ घेतील त्यांना दूध भुकटी नियार्तीसाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळणार नाही.

 

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाnagpurनागपूरNitin Gadkariनितीन गडकरीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAjit Pawarअजित पवारSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना