मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2019 18:10 IST2019-09-14T18:10:38+5:302019-09-14T18:10:46+5:30
विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे.

मुख्यमंत्र्यांची 'महाजनादेश' म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा: राजू शेट्टी
मुंबई - विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यात काढलेली महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा खोचक टोला त्यांनी फडणवीस यांना लगावला.
विरोधात असताना 'संघर्ष' यात्रा काढणाऱ्या फडणवीस यांनी सत्तेत आल्यावर, आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महाजनादेश यात्रा काढली आहे. याच यात्रेतून भाजपने पाच वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला जात आहे. मात्र या महाजनादेश यात्रेवरून राजू शेट्टी यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. महाजनादेश यात्रा म्हणजे जनतेवर लादलेली यात्रा असल्याचा टोला त्यांनी यावेळी लगावला.
सगळीकडे बेरोजगारी वाढली आहे. शेतकरी मोठ्याप्रमाणावर आत्महत्या करतायत , निम्मा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला तर उर्वरित भागात महापूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र असे असताना ही मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सुरूच असून, त्या यात्रेत हे प्रश्न दिसत नाही.असा आरोप सुद्धा त्यांनी आरोप केले.