शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

भाजप-शिवसेनेकडून जनमताचा अपमान, शेतकरी नेते राजू शेट्टी यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 6:29 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सरकार स्थापन करण्यास चालढकल करत असलेल्या भाजपा आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - महाराष्ट्रातील जनतेने नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला स्पष्टपणे बहुमत दिल्यानंतर त्यांच्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष म्हणजे जनतेचा अपमान असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.नवी दिल्ली येथे गुरुवारी अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेनंतर शेट्टी बोलत होते. युतीने निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्री आणि मंत्रीपदांबाबत निर्णय घेणे आवश्यक होते. सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पक्षांना आवश्यक जागा मिळाल्यानंतर सुरू असलेले मतभेद त्यांच्या उणीवा दाखवून देणारे आहे, असेही शेट्टी म्हणाले. महाराष्ट्रात झालेली निवडणूक कोणत्याही मुद्द्याशिवाय लढली गेली. शेतकºयांच्या मुद्द्यावर विचार करायला कोणालाही वेळ नव्हता. महाराष्ट्रात महापुरामुळे जवळपास २५ टक्के शेतकरी हैराण झालेले आहेत. मान्सूननंतर परतीच्या पावसामुळे विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर १० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे न केल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून विम्याची रक्कम मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करवून घेण्याची जबाबदारी काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची होती. मात्र, फडणवीस यांना केवळ दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद मिळेल की नाही याची काळजी होती. कोणत्याही राजकीय पक्षाचे याकडे लक्ष नसने हे दुर्दैवी असल्याचे शेट्टी म्हणाले. एकाच टप्प्यात निवडणुका झाल्यामुळे विरोधकांना फटका बसल्याचेही शेट्टी म्हणाले. हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आमची लढाई सुरूच राहणार आहे, असेही शेट्टी म्हणाले. ‘आरसीईपी’मुळे दूध उत्पादकांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवरून दूध पावडर आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय शेतकऱ्याला संपविणारा ठरेल. मुक्त व्यापार पद्धतीद्वारे दूध पावडर आयात केल्याने दूधाचा भाव २२ रुपये लीटरवर येईल त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल, असा दावाही शेट्टी यांनी केला.    ३७०चा मुद्दा सत्ताधाऱ्यांवर उलटला!केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जत येथे कलम ३७०च्या मुद्द्यावर भाषण केल्यामुळे विलास जगताप या उमेदवाराचा पराभव झाला. जनतेला पिण्यासाठी पाणी नसताना शहा यांनी ३७०चे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आणि उमेदवाराला फटका बसला. या मुद्द्यामुळे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी ३७०मुळे भाजपच्या उमेदवारांना फटका बसल्याचा दावा शेट्टी यांनी केला. विरोधकांचा सेनेला पाठिंबा?काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेला पाठिंबा देण्याची तयारी केली आहे. काही मुद्द्यांवर चर्चा शिल्लक आहे. मात्र, शिवसेनेने भाजपसमोर शरणागती पत्करल्यामुळे विरोधकांची नीति अपयशी ठरण्याची शक्यता असल्याचेही शेट्टी म्हणाले.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण