राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 16:47 IST2025-08-21T16:35:01+5:302025-08-21T16:47:27+5:30
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याचा दावा केला.

राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
उपराष्ट्र्रपती पदासाठी ९ सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिली आहे, तर एनडीएने सी.पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली. दोन्ही बाजूंनी मोठी तयारी केली असून काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी शिवसेना (ठाकरे गटाचे) प्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. यादरम्यान त्यांनी एनडीएचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा मागितल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी केला.
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली. "संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून राधाकृष्णन यांच्या बाजूने मतदान करण्याची विनंती केली. त्यांनी इतरांनाही असेच केले असेल. हे त्यांचे काम आहे, असा दावा राऊतांनी केला.
तामिळनाडूचे अनुभवी भाजप नेते राधाकृष्णन यांनी बुधवारी उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएचे उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुवारी इंडिया ब्लॉकचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
रेड्डी यांना विरोधी पक्षाचा संयुक्त उमेदवार म्हणून निवडण्याच्या हालचालीमुळे उपराष्ट्रपतींची निवडणूक रंजक बनली. दोन्ही उमेदवार दक्षिणेतील आहेत.
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठीच्या निवडणूक मंडळात लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य असतात. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे नामनिर्देशित सदस्य देखील मतदान करू शकतात. निवडणूक मंडळाची प्रभावी संख्या ७८१ आहे आणि बहुमताचा आकडा ३९१ आहे.