शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
9
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
10
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
11
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
12
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
13
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
14
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
15
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
16
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
17
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
18
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
19
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
20
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार

Corona Vaccination: गुड न्यूज! राज्यात आता ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार: राजेश टोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 11:59 PM

Corona Vaccination: राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली आहे.

मुंबई: संपूर्ण देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा तडाखा बसला होता. महाराष्ट्रातही कोरोनाबाधित आणि मृत्यूंची संख्या वाढलेली पाहायला मिळाली. मात्र, आता कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर ओसरताना दिसत असून, लसीकरण मोहिमेवर पुन्हा अधिकाधिक भर दिला जात आहे. यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिलासा देणारी माहिती दिली असून, त्यानुसार, आता शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोटातील नागरिकांचे लसीकरण सुरू केले जात आहे. (rajesh tope declared corona vaccination of age group of 30 to 44 will start from 19 june)

PMC बँकेला नवसंजीवनी मिळणार!; RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय

राज्यात शनिवार, १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांच्या कोरोना लसीकरणास सुरुवात होणार आहे.  याशिवाय ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. 

सेना भवनावर मोर्चा काढणाऱ्या भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा नितेश राणेंनी केला सत्कार

कोविन अॅप मध्ये आवश्यक ते बदल करणार

राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला आहे. या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार असून, विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकिस्तक, जिल्हा आरोग्यधिकारी यांना त्याबाबत पत्र पाठविले आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. 

इंधनदरवाढीवर नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय; लीटरमागे २० रुपयांची बचत शक्य!

कधीही मृत्यू लपवले नाहीत

राज्यात करोनाचे मृत्यू लपवले हे आरोप मी कधीही सहन करणार नाही, ते अत्यंत खोटे आरोप आहेत, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट करत केले जाणारे आरोप फेटाळून लावले आहेत. महाविकासआघाडीने मृत्यू लपवलेले नाहीत. देशात महाराष्ट्र अॅक्टिव्ह केसेस आणि मृत्यूसंख्येच्या बाबतीत क्रमांक एकवर होता. ते आम्ही कधीही लपवले नाही. खासगी रुग्णालयांनी मृतांचे आकडे वेळेवर दिले पाहिजेत. बऱ्याचदा खासगी रुग्णालयांकडून १५ दिवस आकडे उशिरा दिले जातात, हे याचे कारण असू शकते, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRajesh Topeराजेश टोपेState Governmentराज्य सरकारCorona vaccineकोरोनाची लसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या