शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

कात्रजचा घाट; काँग्रेसला हूल देऊन राजेंद्र गावित भाजपाच्या गोटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 17:13 IST

भाजपाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याने गावित यांना आपला शब्द फिरवायला भाग पाडले. 

मुंबई: राज्यातील आगामी विधानपरिषद आणि पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांना कात्रजचा घाट दाखवला. कालच रमेश कराड यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावून भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसवर कुरघोडी केली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा भाजपाने 'राजकीय व्यवस्थापन कौशल्याचा' उत्कृष्ट नमुना पेश करत काँग्रेसला धक्का दिला. आज (मंगळवार) सकाळपासून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असे सांगणारे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाची ही राजकीय खेळी काँग्रेसबरोबरच शिवसेनेला काटशह देणारी मानली जात आहे. तत्पूर्वी आज सकाळपासूनच पालघर पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे संभाव्य उमेदवार राजेंद्र गावित भाजपामध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेत तथ्य नसल्याचं गावित यांनी स्पष्ट केलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मात्र, भाजपाने आपल्या व्यवस्थापन कौशल्याने गावित यांना आपला शब्द फिरवायला भाग पाडले. राजेंद्र गावित यांच्या अधिकृत पक्ष प्रवेशानंतर आता पालघर पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीसाठी त्यांचे नाव पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आले आहे. आज रात्रीपर्यंत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. भाजपाचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर लोकसभा मतदारसंघात २८ मे रोजी पोटनिवडणूक होत आहे. वनगा यांच्या कुटुंबानं गेल्याच आठवड्यात शिवसेनेत प्रवेश केला. चिंतामण वनगा यांचे पुत्र श्रीनिवास यांना शिवसेनेनं उमेदवारी दिल्यानं भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच भाजपाकडून गावित यांना उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू होती. गावित यांना भाजपा प्रवेश देऊन त्यांना निवडणुकीचं तिकीट द्यायचं, अशी भाजपाची रणनिती असल्याची चर्चा होती. त्यामुळेच गावित यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं. मी काँग्रेसचा कार्यकर्ता असून पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या संपर्कात असल्याचंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018BJPभाजपाcongressकाँग्रेस