शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 19:37 IST

गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस

ठळक मुद्दे२३ व २४ जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : गेल्या काही दिवस ओढ लावलेल्या पावसाचे राज्यात सर्वत्र पुन्हा आगमन होत असून पुढील दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या २४ तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा ११०, गडहिंग्लज ५०, हर्सूल ३०, खंडाळा बावडा, फलटण, विटा २० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यातील अहमदपूर, चाकून, केज, तुळजापूर, वडावणी येथे २० मिमी पाऊस पडला.  विदर्भातील वर्धा ६०, ब्रम्हपुरी, सेलू ३०, देसाईगंज, हिंगणा, कुरखेडा २० मिमी पावसाची नोंद झाली होती. घाटमाथ्यावरील शिरगाव ५०, कोयना (पोफळी) ४०, डुंगरवाडी ३० मिमी पाऊस झाला होता. २३ व २४ जुलै रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. २५ जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.२६ जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.़़़़़़़़़़दोन दिवस या जिल्ह्यात पावसाची शक्यता२३ व २४ जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर, सातारा, औरंगाबाद, जालना, बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. २३ जुलैला उस्मानाबाद तर, २४ जुलै रोजी हिंगोली, नांदेड, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट परिसरात २४ व २५ जुलै रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.  २५ व २६ जुलै रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी