शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
3
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
4
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
5
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
6
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
7
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
8
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
9
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
10
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
11
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
12
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
13
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
14
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
15
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
16
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
17
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
18
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
19
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
20
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने टांगली प्रशासनाची लक्तरे वेशीवर

By admin | Updated: June 29, 2016 03:20 IST

पाहिल्याच पावसाने प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत.

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- पाहिल्याच पावसाने प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. नरपड, चिखले आणि घोलवड या ग्रामपंचायतींच्या दुर्लक्षामुळे ऐन पावसाळ्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. पावसाळया पूर्वी गावातील पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्यालगत गटारांची सोय, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक होते. मात्र या तिनही ग्रामपंचायतीने याबाबत योग्य नियोजन न केल्याने ग्रामस्थांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. नरपड ग्रामपंचायतीचा ग्रामविकास अधिकारी गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर आहेत. त्यामुळे पावसाळयापूर्वी करावायची कामे झालेली नाहीत. दरवर्षी प्रमाणे पावसाळयापूर्वी गटार व्यवस्था न केल्याने रस्त्यावर पाणी साचणे तसेच घरांमध्ये पाणी घुसण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. चिखले ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील संवाद आणि सामंजस्याच्या अभावामुळे ग्रामविकासाला खीळ बसली आहे. रस्त्याच्या दुतर्फा आणि सार्वजनिक ठिकाणी अतिक्र मण करून बांधकामे उभी राहिली आहेत. >काय आहे सध्याची नेमकी परिस्थिती?गटारे खोदण्याची परंपरा गटातटाच्या राजकारणामुळे खंडीत होवून, पावसाचे पाणी निचरा होण्यात अडचणी येत आहेत. उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावलेली नाही. राजकीय लागेबांधे जपण्यामुळे निकृष्ट कामे झाल्याने रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य व तळी साचली आहेत. घोलवड गावातील मुख्य रस्तावरील मोरीच्या दोन्ही बाजूला पाणी साचल्याने मार्गक्र मण करणे कठीण बनले आहे. कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याने दुर्गंधी, डासांचा वाढता उच्छाद आणि आजाराची साथ पसरण्याची भीती गामस्थांना सतावते आहे.