शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
3
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
4
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
5
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
6
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
7
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
8
Gemology: भाग्यरत्न घातल्याने खरोखरंच भाग्य बदलते का? कोणत्या रत्नाचा काय प्रभाव पडतो जाणून घ्या!
9
राज ठाकरेंच्या पाठिंब्यानं महायुतीला बळ; भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे 'शिवतीर्थ'वर
10
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
11
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद
12
IPL मुळे भारताच्या वाट्याला T20 WC पूर्वी १ सराव सामना; दोन बॅचमध्ये संघ अमेरिकेला जाणार
13
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
14
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
15
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
16
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
17
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
18
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
19
निखळ सौंदर्यानं अभिनेत्रींना देते मात; सरकारी अधिकारी अन् मोफत उपचार करणारी डॉक्टर
20
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!

परतीच्या पावसाचा दणका, खान्देशात मुसळधार : पुण्यात ढगफुटी, गोदावरीला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 3:39 AM

राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे.

मुंबई : राज्यात सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने बुधवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात दाणादाण उडविली. वीज पडून यवतमाळमध्ये एक विद्यार्थिनी तर जगळगावला मेंढपाळाचा मृत्यू झाला. बीडमध्ये पुरात वाहून जाणा-या दोन शाळकरी मुलांना वाचविण्याच्या प्रयत्नात एकाचा बुडून मृत्यू झाला. दोन्ही मुले बेपत्ता आहेत. उस्मानाबादमध्ये शेतकरी वाहून गेला. सोलापूरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाला. बीड व उस्मानाबादेत अतिवृष्टी झाली व पिकांचे मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने मराठवाड्याला फटका बसला आहे. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर उस्मानाबादला पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला तर नाशिकला धो धो कोसळणा-या पावसामुळे गोदावरीला पूर आला आहे.बीड जिल्ह्यातील १३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परळी तालुक्यातील नागापूर महसूल मंडळात सर्वाधिक १५५ मि.मी. पावसाची नोंद झाली. उस्मानाबादेत चार मंडळांत अतिवृष्टी झाली. पश्चिम वºहाडात दमदार पाऊस झाला. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले आहे.खान्देशात जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. धुळे तालुक्यात अतिवृष्टीचा पिकांना फटका बसला. पांझरा, बुराई नद्यांना पूर आला आहे. पुणे जिल्ह्यात ढगफुटीसारखा पाऊस झाला. मंचरला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन वाहून गेली. भोर तालुक्यातील भुंगवली गावात ढगफुटी झाल्याने पिकांचे नुकसान झाले. सोलापूरमध्ये पाऊस झाला. नाशिकमध्ये नद्या-नाले पुन्हा दुथडी भरून वाहत आहेत. गंगापूर तसेच दारणा धरणातून विसर्ग करण्यात आला आहे. पावसाने द्राक्ष, कांदा तसेच तूर, सोयाबीन, मका पिकांचे नुकसान होण्याची भीती आहे.तिलारी धरण भरले-महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्तरीत्या उभारलेले आणि या दोन्ही राज्यांच्या सीमेलगत असलेले तिलारी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण भरल्यामुळे गोमंतकीयांसमोरील पाण्याचा प्रश्न दूर होण्याची चिन्हे आहेत.

पुण्यात झाला ढगफुटीसारखा पाऊस-पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला.भीमा नदीला पूर आल्याने काही गावांचा संपर्क तुटला होता. नाशिकला सलग पाचव्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यात ३६ तासांत ५३६ मिमी पाऊस झाला. गोदावरी, दारणा नद्यांना पूर आला आहे.

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र