शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

Rain Update: कोकणात रेड अलर्ट, सोलापुरात पूरस्थिती; पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा तडाखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2020 06:45 IST

पंढरपुरात घाटाची भिंत कोसळून सहा ठार, १८ ऑक्टोबर रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे

सोलापूर/मुंबई/कोल्हापूर : संपूर्ण कोकण, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. सोलापूर, लातूर आणि उस्मानाबादमध्ये ढगफुटीसारखा धो-धो पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. पंढरपुरात घाटाची भिंत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला, तर सिंधुदुर्गमध्ये एक महिला वाहून गेली. गुरुवारी संपूर्ण कोकणला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

पंढरपुरात चंद्रभागा नदीकाठावर कुंभारघाटाजवळ नव्या घाटाचे काम सुरू आहे. येथे लोकांनी झोपड्या बांधल्या होत्या. घाटाची २० फूट भिंत कोसळल्याने गोपाळ अभंगराव, राधाबाई अभंगराव, मंगेश अभंगराव, संग्राम जगताप (१२) यांच्यासह अन्य दोन महिलांचा मृत्यू झाला आहे.मुंबई, ठाणे, रायगडला आज अति मुसळधारेचा इशारामुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात गुरुवारी अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक होता. सोलापूर, सातारा आणि सांगलीत जोरदार पाऊस झाला आहे. पुढील १२ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचा जोर कमी होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट आहे. वाºयाचा वेग ताशी ४० किमी आहे. मुंबई, ठाणे, पालघरला यलो अलर्ट आहे. येथे मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले.पुरात वाहून गेल्याने महिलेचा मृत्यूपरतीच्या पावसाने कोकणातही संततधार कायम ठेवली आहे. त्यामुळे कापणीला आलेली भातशेती पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने भातपीक धोक्यात आले आहे. कोंडये तेलीवाडी (ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग) येथील मयूरी मंगेश तेली (३५) ही महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली.पावसाळा लांबणार, २० ऑक्टोबरपर्यंत पाऊसअरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आणखी वाढणार असल्याने राज्यात ऑगस्टमध्ये पडतो, तसा सर्वदूर पाऊस पडण्याची शक्यता आहे. १८ ऑक्टोबर रोजी आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असून त्यामुळे पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. २० ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूरfloodपूरkonkanकोकण