Rain Update In Maharashtra: पावसाची दिंडी, पेरण्यांची नांदी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 08:18 IST2023-06-29T08:18:41+5:302023-06-29T08:18:41+5:30

Rain Update In Maharashtra: राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोर धरला

Rain Update In Maharashtra: The beginning of the rains, sowing! | Rain Update In Maharashtra: पावसाची दिंडी, पेरण्यांची नांदी!

Rain Update In Maharashtra: पावसाची दिंडी, पेरण्यांची नांदी!

मुंबई : राज्यात मान्सूनच्या आगमनानंतर पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर जिल्ह्यात जोर धरला असून,  याच भागात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने  वर्तविली आहे.  विदर्भातील भंडारा, चंद्रपूृर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. 
राज्यातील उत्तर कोकण तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे, तर राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता आहे.

Web Title: Rain Update In Maharashtra: The beginning of the rains, sowing!