Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 09:18 IST2025-05-19T09:06:06+5:302025-05-19T09:18:05+5:30

Rain Update : आज पहाटेपासून रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर मुंबईत काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे.

Rain Update Heavy rain in Ratnagiri since morning, scattered rain in Mumbai; Alert of heavy rain in the state for the next few days | Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट

Rain Update : रत्नागिरीत सकाळपासूनच जोरदार, मुंबईत तुरळक पाऊस; राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट

Rain Update ( Marathi News ) : रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या जोरदार पावसांच्या सरीमुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली. वाहनधारकांनी तसेच नागरिकांनी आडोशाचा आधार घेतला. मुंबईतही काही ठिकाणी सकाळी पाऊस झाला. दरम्यान, हवामान विभागाने पुढचे काही दिवसात राज्यात अवकाळी पावसाचा अलर्ट दिला आहे.  

‘आग’वार, २५ ठार... ! टॉवेल निर्मिती कारखान्यात होरपळून आठ जणांचा मृत्यू, तर ‘चारमिनार’लगतच्या इमारतीत १७ जणं गुदमरून ठार 

कोकण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा अंदाज आहे. तर मंगळवारपासून मराठवाड्यातही पावसाचा अंदाज दिला आहे. मुंबईत काल रविवारपासूनच पावसाचे वातावरण झाले आहे, आज पहाटे काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. अजूनही पावसाचे वातावरण आहे. मुळे आज मुंबईत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. 

हवामान खात्याने पावसाचा अलर्ट दिला

पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा हवामान खात्याने अलर्ट दिला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता तसेच काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विजांच्या कडकडाटासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 17 ते 20 मे दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली.

रत्नागिरीत पहाटेपासून जोरदार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या जोरदार पावसांच्या सरीमुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नोकरदार वर्गाची धावपळ उडाली. अरबी समुद्रात  चक्राकार वाऱ्यांमुळे हवामान खात्याने अवकाळी ची शक्यता वर्तवली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासूनच अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण झाला आहे.

Web Title: Rain Update Heavy rain in Ratnagiri since morning, scattered rain in Mumbai; Alert of heavy rain in the state for the next few days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस