शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने झोडपले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:38 IST

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली. शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.

नाशिक : गेल्या तीन ते चार दिवसांपासून शहरात जोरदार पाऊस सुरू आहे. बुधवारी (दि.११) नाशिककरांना पावसाने चांगलेच झोडपले. दुपारी शहराच्या मध्यवर्ती भागासह विविध उपनगरांमध्ये पावसाला जोरदार सुरुवात झाली.शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी होता; मात्र बुधवारी सकाळपासून शहरात ढगाळ हवामान कायम असल्याने दुपारी तीन वाजेपासून पावसाला जोरदार सुरुवात झाली. सुमारे दीड तास चाललेल्या पावसाने नाशिककरांची दैना उडविली. शहरासह उपनगरांमध्येही पावसाचे थैमान सुरू होते. सर्व परिसर जलमय झाला होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते.दरम्यान, गंगापूर धरणातून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाच हजार क्यूसेकचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. दुपारी एक वाजेनंतर हा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी गोदावरीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण शहरात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. गोदावरीवरील अहल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे नदीपात्रात ६ हजार ५६० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. गंगापूर धरणातून मंगळवारी रात्री बारा वाजता विसर्ग वाढविण्यात आला होता.बुधवारी दुपारपर्यंत ५११६ क्यूसेक विसर्ग सुरू होता. गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्ग दुपारी एक वाजता ४५४५ क्यूसेक तर चार वाजता २८७४ क्यूसेकवर आणला गेला; मात्र शहरात चार वाजेपासून पावसाला पुन्हा जोरदार सुरुवात झाल्याने गोदावरीच्या पाण्याची पातळी वाढली होती. धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊसबुधवारी सकाळी सहा वाजेपर्यंत त्र्यंबकला १२, गंगापूरला ११ तर कश्यपी ३८, गौतमी-गोदावरीच्या परिसरात ६९, अंबोली परिसरात ७४ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. एकूणच गंगापूर धरण समूहातील गौतमी, कश्यपी, अंबोली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणात बुधवारी दुपारपर्यंत पाण्याची मोठी आवक सुरू होती. त्यामुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेला ५००० क्युसेकचा विसर्ग बुधवारी दुपारपर्यंत कायम होता. मात्र, दुपारनंतर पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने विसर्गामध्येही कपात झाली.