शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या TVK पक्षाचा 'ब्लॉकबस्टर शो'; DMK ला जोरदार धक्का
2
West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये बहुमतासाठी किती हवा आकडा?; भाजपा इतिहास घडवण्याच्या तयारीत
3
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
4
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
5
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स ३४४ तर निफ्टीमध्ये ६६ अंकांची वाढ; 'हे' शेअर्स सुस्साट
6
'राजा शिवाजी'मध्ये शिवरायांच्या सासूच्या भूमिकेत दिसली 'ही' अभिनेत्री, पोस्ट शेअर करत म्हणाली...
7
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
8
अंगारक संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, WhatsApp Status शेअर करून बाप्पाचे आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवा
9
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
10
Baramati Rahuri Results 2026: बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
11
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
12
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
13
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
14
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
15
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
16
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
17
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
18
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
19
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
20
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, मिरजमध्ये छापे

By admin | Updated: September 20, 2015 00:16 IST

कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित रुद्रगौडा पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्यासह काही

सांगली : कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी गोव्यातील मडगाव बॉम्बस्फोटातील फरार संशयित रुद्रगौडा पाटील याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्याच्यासह काही साधकांच्या शोधासाठी शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरजेसह जत तालुक्यात छापे टाकले. पण हाती काहीच लागले नाही.मडगाव येथे २००९मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सांगलीत पत्रकार म्हणून काम केलेला मलगोंडा पाटील हा ठार झाला होता. मलगोंडा हा रुद्रगौडा पाटीलचा चुलत भाऊ आहे. स्फोटानंतर तो फरार झाला होता. कॉ. पानसरेंच्या हत्येप्रकरणी समीर गायकवाडला अटक केल्यानंतर रुद्रगौडा पाटील पुन्हा चर्चेत आला आहे. त्याचाही हत्येमध्ये सहभाग असण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पुन्हा प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी पोलिसांनी सांगली, मिरज व जत तालुक्यात छापे टाकले. मृत मलगोंडा पाटील याच्या काराजनगी येथील घरीही पोलीस जाऊन आले असल्याचे समजते. यासंदर्भात पोलिसांकडे विचारणा केली. परंतु त्यांना हा तपासाचा भाग आहे, आम्हाला काहीच माहिती देता येत नाही, असे सांगून अधिक भाष्य करण्यास टाळले. रुद्रगौडा पाटीलच्या संपर्कात आलेल्या काही साधकांवर पोलिसांची नजर ठेवली आहे. त्यांचाशी शोध सुरु ठेवला आहे.ज्योतीचा जबाब नोंदविलाज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी समीर गायकवाड याची प्रेयसी ज्योती कांबळे हिला शनिवारी अटक न दाखविता तिचा कायदेशीर जबाब नोंदविला असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. समीरच्या संकेश्वर येथील जवळच्या दोघा नातेवाइकांची चौकशी करून त्यांना घरी पाठविल्याचे तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.तिघांचेही मारेकरी एकाच विचारांचे -मुक्ता दाभोलकरसोलापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी एकाच विचारांचे आहेत, असे मत अंधश्रद्धा निर्र्र्मूलन समितीच्या अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केले. करमाळा येथे सर्वोदय प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानमालेनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. कॉ. पानसरे यांच्या हत्येचा तपास पोलीस योग्य दिशेने सुरू असून, तपासाबाबत आम्ही समाधानी आहोत, यातून नक्कीच खरे गुन्हेगार समोर येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.