शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
2
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
3
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
4
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
5
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
6
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
7
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
8
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
9
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
10
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
11
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
12
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
13
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
14
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
15
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
16
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
17
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
18
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
19
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?

विधानसभाध्यक्षपदी पुन्हा राहुल नार्वेकर अर्ज भरला, आज बिनविरोध निवड होणार, विरोधकांचा उमेदवार नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 06:02 IST

२०२२ मध्ये भाजप-शिंदेसेनेचे सरकार आले, तेव्हा नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भाजपचे कुलग्या मुंबईतील आमदार अॅड. राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा विधानसभेचे अध्यक्ष होणार आहेत. या पदासाठी रविवारी त्यांनी अर्ज भरला. त्यांचा एकट्याचा अर्ज असल्याने या पदावर त्यांची बिनविरोध निवड सोमवारी होणार हे निश्चित झाले. 

विधानसभा अध्यक्षपदासाठी नार्वेकर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची नावे चर्चेत होती. मात्र, भाजपने नार्वेकर यांनाच पसंती दिली. २०२२ मध्ये भाजप-शिंदेसेनेचे सरकार आले, तेव्हा नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता ते दुसऱ्यांदा या पदावर निवडून येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्ती मानले जातात. 

उपाध्यक्षपद देण्याची विरोधकांची मागणीमहाविकास आघाडीने अध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला नाही, पण आम्हाला उपाध्यक्षपद द्या, अशी मागणी मविआच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांना भेटून केली. उपाध्यक्षपद विरोधी पक्षांना देण्याची पूर्वी परंपरा होती, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 

विश्वासदर्शक ठराव आज देवेंद्र फड़णवीस यांच्या सरकारवर विश्वास व्यक्त करणारा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. शिंदे सेनेचे उदय सामंत, भाजपचे डॉ. संजय कुटे, अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील आणि अपक्ष रवी राणा हा विश्वासदर्शक ठराव मांडतील. 

नागपूर अधिवेशनाचा कार्यक्रम आज ठरणार नागपूरचे विधिमंडळ अधिवेशन किती दिवसांचे असेल, याचा निर्णय सोमवारी विधानभवनात होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे. अधिवेशन २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ते २१ डिसेंबरपर्यंत चालणार अशी शक्यता असली, तरी अंतिम निर्णय उद्याच्या बैठकीत होईल.

टॅग्स :Rahul Narvekarराहुल नार्वेकरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४