शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांची आज महाडमध्ये सभा

By admin | Updated: October 8, 2014 04:23 IST

महाड मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा बुधवारी महाड येथे होणार आहे

महाड : महाड मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा बुधवारी महाड येथे होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्रात राहुल गांधी यांची ही पहिलीच जाहीर सभा असेल. गांधी यांच्या या दौऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.चांदे क्रीडांगणावर दुपारी १२ वाजता होणाऱ्या या प्रचारसभेला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश आदी काँग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेची जय्यत तयारी करण्यात येत असून चांदे क्रीडांगणावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. या मतदार संघात काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित असलेले माणिक जगताप हे राहुल ब्रिगेडमधील महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. या सभेला ५० हजारांहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सभेच्या ठिकाणाची तसेच परिसराची तपासणी केंद्रीय सुरक्षा पथकासह राज्य पोलिसांच्या विरष्ठ अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. शशिकात महावरकर हे गेल्या दोन दिवसापासून महाडमध्ये तळ ठोकून सुरक्षिततेची काळजी घेत आहेत.