राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 00:30 IST2019-02-11T00:29:57+5:302019-02-11T00:30:25+5:30

‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत.

 Rahul Gandhi knows how much God knows - Subhash Bhamare; | राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे

राहुल गांधींचा बुध्यांक किती हे देवालाच माहीत- सुभाष भामरे

जळगाव: ‘राफेल’ बाबत कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर होत असलेले आरोप तथ्यहीन आहेत. व्यवस्थित माहिती न घेता वारंवार आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांचा बुध्यांक किती असेल हे देवालाच माहीत, अशी टीका केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केली.
भाजपाच्या जळगाव, रावेर, धुळे व नंदुरबार लोकसभा क्षेत्र शक्ती प्रमुख संमेलनात ते बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्टÑीय उपाध्यक्ष श्याम जाजू, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी उपस्थित होते. ते म्हणाले की, अंबानी यांच्या कंपनीला मोदी यांनी राफेलचा ठेका दिल्याचा आरोप चुकीचा आहे.

अजित पवारांचे आव्हान स्वीकारतो- महाजन
भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण बारामती व अजित पवारच काय कोणाचेही आव्हान स्वीकारण्यास तयार आहे, असे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. एकीकडे पवार बारामतीत बोलवतात तर दुसरीकडे पाचोऱ्यात आमदार किशोर पाटील बोलवतात. मी एकटा कोठे कोठे उभा राहणार? असा सवालही त्यांनी केला.

Web Title:  Rahul Gandhi knows how much God knows - Subhash Bhamare;

टॅग्स :Jalgaonजळगाव