शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

फडणवीसांना रामाचा अवतार जाहीर करा; म्हणजे राज्यात रामराज्य अवतरेल! विखे-पाटलांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 16:03 IST

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात भाजपाकडून काढण्यात येणाऱ्या सुराज्य यात्रेवर घणाघाती टीका केली आहे.

 जालना -  ''मागील ४ वर्षे महाराष्ट्रात ‘कुराज्य’असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले. ‘राम राज्य यात्रा’म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून टाका. म्हणजे महाराष्ट्रात आपसूकच ‘राम राज्य’ अवतरेल,'' अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आ काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत जालना येथील जाहीर सभेत बोलताना केली.   राज्य सरकारला चार वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपने २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत सुरू केलेल्या सुराज्य यात्रा काढली असून, हाच धागा धरून विखे पाटील यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. "भाजपची सुराज्य यात्रा ४ दिवसात एकूण १३ जिल्ह्यात फिरणार आहे. म्हणजे एका दिवसात कमीत कमी तीन जिल्हे फिरणार. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत एका जिल्ह्याला एक दिवससुद्धा कमी पडतो आणि भाजप एका दिवसात तीन-तीन जिल्हे फिरायला निघाली आहे. आम्ही अनेक यात्रा पाहिल्या. पण अशी बुलेट ट्रेनसारखी वेगवान यात्रा अजून कधी पाहिली नव्हती. कदाचित ही यात्रा इतकी वेगात जाईल, की ती लोकांना दिसणारही नाही. अद्श्यच असल्यासारखी असेल. सरकारचे कामही अदृश्य अन् त्यांची यात्राही अदृश्य असेल. पुढील निवडणुकीत या सरकारलाच अदृश्य केले पाहिजे. अन्यथा पुढील काळात या देशातील शेतकरी अदृश्य झाल्याशिवाय राहणार नाही," अशी टीका विखे-पाटील यांनी केली.

राधाकृष्ण विखे-पाटील पुढे म्हणाले की, ''भाजप-शिवसेनेला १५ वर्षानंतर फक्त नशिबाने सत्ता मिळाली. पण यांची अवस्था ‘दैव देते, अन कर्म नेते’ सारखी झाली आहे. आज चार वर्षानंतर आपण काय केले, ते सांगण्यासारखे ठोस असे सरकारकडे काहीही नाही. या चार वर्षात सरकारने फक्त फक्त ‘इव्हेंट’, ‘स्टंट’ आणि जनतेच्या तिजोरीतील हजारो कोटी रूपये खर्च करून खोटी जाहिरातबाजी केली. वर्तमानपत्र,टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया, एसटी,रेल्वे, पेट्रोल पंप, एटीएम मशीन अशी एकही जागा यांनी जाहिरातीतून सोडली नाही. फक्त सुलभ शौचालयाच्या आत भाजपच्या जाहिराती लागलेल्या नाहीत, हे नशीबच म्हणावे लागेल,''

''भाजप-शिवसेना शेतकऱ्यांप्रती दाखवत असलेला कळवळा खोटा आहे. तो १० टक्केही खरा असेल तर तातडीने दुष्काळ जाहीर करावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रूपयांची मदत द्यावी, यंदाचा खरीप गेला असून, रब्बीसाठी जमिनीत ओल नसल्याने खरिप २०१८ मध्ये घेतलेल्या पीक कर्जासह शेतकऱ्यांचे सगळे कर्ज सरसकट माफ करा,'' अशी मागणी देखील विखे पाटील यांनी यावेळी केली.

भाजप-शिवसेनेच्या फसव्या सरकारविरूद्ध संपूर्ण देशात मोठी लढाई उभी झाली आहे. देशाची लोकशाही,संविधान, सर्वसामान्यांचे मुलभूत अधिकार धोक्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या सरकारविरूद्ध देशपातळीवर संघर्ष उभा केला असून, नजीकच्या काळात भाजप-शिवसेनेचे अनेक खासदार-आमदार देखील काँग्रेसचा झेंडा घेऊन या लढाईत आमच्या खांद्याला खांदा लावून लढताना दिसतील, असे सूतोवाचही राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केले.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलcongressकाँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपा