शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीचे प्रश्न विचारल्याने माझ्या हेतूंविषयी शंका

By admin | Updated: September 24, 2015 01:27 IST

गोवंश हत्याबंदी, राकेश मारियांची बदली, देशद्रोहाच्या गुन्ह्याविषयी सरकारने जारी केलेले परिपत्रक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवर आपण अडचणीचे प्रश्न उपस्थित केले

मुंबई: गोवंश हत्याबंदी, राकेश मारियांची बदली, देशद्रोहाच्या गुन्ह्याविषयी सरकारने जारी केलेले परिपत्रक आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मुद्द्यांवर आपण अडचणीचे प्रश्न उपस्थित केले म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हेतूंविषयी शंका घेत आपल्यावर व्यक्तिगत टीका केली, असे प्रत्युत्तर ज्येष्ठ पत्रकार व स्तंभलेखक राजदीप सरदेसाई यांनी दिले आहे.सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले एक खुले पत्र ‘लोकमत’ने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यास ‘लोकमत’च्याच मंगळवारच्या अंकातून उत्तर दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरास प्रत्युतर देताना सरदेसाई यांनी फडणवीस यांनी मांडलेल्या प्रत्येक मुद्द्यावर खुलासा केला आहे.सरदेसाई मुख्यमंत्र्यांना लिहितात की, आत्मचिंतन करून आपले काही चुकले असेल तर त्यात सुधारणा करणे मला आवडेल. पण कोणीही मला एका ठरावीक कप्प्यात बंद करणे मला आवडत नाही. सर्व नागरिकांना समान संधी उपलब्ध करून देण्याची इच्छा धरून त्या दृष्टीने प्रयत्न करणाऱ्या उदारमतवादी व बहुढंगी भारताच्या संकल्पनेवर माझा दृढविश्वास आहे. पण त्यामुळे मी डाव्या विचारसरणीचा कसा होतो? मुख्यमंत्री त्यांच्याशी सहमत न होणाऱ्यांना किंवा त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांना सरसकटपणे अशीच लेबले लावताना दिसते. मतांधतेविरुद्ध प्रश्न उपस्थित केल्याने मी बेगडी धर्मनिरपेक्षतादी कसा काय होतो? उलट त्यामुळे मी एक स्वाभिमानी व सहृहय भारतीय असल्याचे दिसते, असे सरदेसाई म्हणतात. (विशेष प्रतिनिधी)