बारामती : ते राजकीय षडयंत्र आहे का, मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.याबाबत संबंधित क्लीपची लॅबमध्ये तपासणी करावी.याचा कोणत्याची पक्षाच्या नेत्यांनी राजकीय फायदा कोणी घेवु नये. या वादाबदद्ल कालच धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला.त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील,असे कृत्य माज्याकडुन झाले नसल्याचे सांगितले.ती क्लीप कट केलेली असल्याचे देखील धनंंजय यांचे म्हणले आहे.त्यामुळे त्या क्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार , आई आशाताई पवार, बंधु श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार,बहिण नीता पाटील,पुत्र जय पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी परळी येथील मुंडे बंधु भगिनींच्या वादाच्या पार्श्वभुमीवर हे मत व्यक्त केले. यावेळी पवार म्हणाले,निवडणुकीच्या निमित्ताने असे मुद्दे पुढे येवु नयेत. गटबाजीतुन अशा घटना घडतात. मात्र, हा मुद्दा किती ताणायचा,त्याचा फायदा कोणी घेवु नये. ते मतदार केंद्र संवेदनशील आहे.दोघांचेही कार्यकर्ते संवेदनशील आहेत.शेवटी निवडणुक येतात,जातात.पाच वषार्तुन एकदा निवडणुका येतात.मात्र, रक्ताची नाती कायम असतात. धनंजय ला मी चांगले ओळखतो. त्याने असे काही घडले असते,तर मला स्पष्ट सांगितले असते,हे सांगायला पवार विसरले नाहित.
पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 15:54 IST
Pune Vidhan Sabha Election 2019 : मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.
पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका
ठळक मुद्देकाटेवाडी येथे सहकुटुंब केले मतदानक्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे