"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:32 IST2025-07-27T16:31:01+5:302025-07-27T16:32:54+5:30

Pune Rave Party Latest Marathi News: एकनाथ खडसेंच्या जावयाला पुण्यातील रेव्ह पार्टीत रंगेहाथ पकडण्यात आलं

Pune Rave Party News BJP Chitra Wagh slams Eknath Khadse Rohini Khadse Uddhav Thackeray Birthday Sanjay Raut | "उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला

"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला

Pune Rave Party Latest Marathi News: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी रविवारी सकाळपासून चर्चेत आहे. माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar) यांना रेव्ह पार्टीमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. प्रांजल खेवलकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती आहेत. ते रेव्ह पार्टीत सापडल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तशातच आज महाविकास आघाडीतील मित्रपक्ष शिवसेना उबाठा गटाचे उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस (Uddhav Thackeray Birthday) आहे. याच मुद्दावरून भाजपा आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडीला खोचक टोला लगावला.

महाविकास आघाडीला टोमणा

चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना उद्देशून एक ट्विट केले. त्यात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचा उल्लेख केला आणि टोला लगावला. "कोकेन आणि गांजा ! उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी त्यांच्या सहयोगी पक्षाच्या महिला अध्यक्षाने असे गिफ्ट देण्याची काय गरज होती…? किमान सकाळच्या भोंग्याचा तरी विचार करायचा..!" असा टोमणा चित्रा वाघ यांनी रोहिणी खडसे यांना मारला. "असो, समाज सुधारणेची जबाबदारी सर्वांचीच आहे. पण त्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते, असे संत परंपरा सांगते. ड्रग्जविरोधी मोहीम आणखी तीव्र करा, अशी आमची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे विनम्र मागणी आहे…" असेही चित्रा वाघ यांनी लिहिले.

दरम्यान, आज उद्धव ठाकरेंच्या ६५व्या वाढदिवशी मुंबईच्या राजकारणाच्या दृष्टीने एक महत्त्वाची घटना घडली. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु आहेत. तशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तब्बल ६ वर्षांनी मातोश्रीवर गेले. उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी मातोश्री गाठले. १८ वर्षांपूर्वी राज यांनी मातोश्री सोडली होती. यानंतर राज ठाकरे मातोश्रीवर अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ५ जानेवारी २०१९ रोजी आले होते. त्यानंतर आज राज पुन्हा मातोश्रीवर आले.

Web Title: Pune Rave Party News BJP Chitra Wagh slams Eknath Khadse Rohini Khadse Uddhav Thackeray Birthday Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.