म्हाडा लॉटरीवेळी मोठा घोळ...! सगळे ७० लाख भरले, अधिकाऱ्यांनी घर दुसऱ्यालाच विकले; विजेत्याने भर सभेत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 14:24 IST2026-02-11T14:22:17+5:302026-02-11T14:24:01+5:30

Pune MHADA Pune Lottery 2026: म्हाडाच्या घरासाठी ७० लाख भरूनही विजेत्याला घर नाकारले. म्हाडाने ते घर दुसऱ्यालाच विकल्याचा आरोप. नितीन घोरपडे यांनी पुणे लॉटरी सोडतीत मंत्र्यांसमोर मांडली व्यथा. वाचा सविस्तर.

Pune MHADA Pune Lottery 2026 video Viral: Big mess during MHADA lottery Pune 2026...! paid 70 lakhs, officials sold the house to someone else; The winner exposes in yesterdays lottery venue | म्हाडा लॉटरीवेळी मोठा घोळ...! सगळे ७० लाख भरले, अधिकाऱ्यांनी घर दुसऱ्यालाच विकले; विजेत्याने भर सभेत...

म्हाडा लॉटरीवेळी मोठा घोळ...! सगळे ७० लाख भरले, अधिकाऱ्यांनी घर दुसऱ्यालाच विकले; विजेत्याने भर सभेत...

पुणे: २०१९ मध्ये म्हाडाची लॉटरी लागलेल्या एका व्यक्तीने घराचे पूर्ण ७० लाख रुपये भरले असतानाही, म्हाडाने तेच घर दुसऱ्याला विकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या लॉटरी सोडतीदरम्यान पीडित विजेत्याने भर सभेत आपला संताप व्यक्त केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

नितीन घोरपडे यांना २०१९ च्या म्हाडा लॉटरीमध्ये एक फ्लॅट लागला होता. या घरासाठी त्यांनी कर्ज काढून ७० लाख रुपये म्हाडाकडे जमा केले. मात्र, सर्व पैसे भरूनही त्यांना घराचा ताबा मिळाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, म्हाडाने तेच घर परस्पर दुसऱ्या व्यक्तीला विकले, असा दावा घोरपडे यांनी केला आहे.

मंत्र्यांसमोरच फुटला संयम
मंगळवारी पुण्यात निवडणुकांमुळे रखडलेल्या लॉटरीची सोडत काढण्यात येत होती. यावेळी उपस्थित मंत्री, अधिकाऱ्यांसमोर घोरपडे यांनी उभे राहून आपली व्यथा मांडली. "मी गेल्या ५ वर्षांपासून मंत्रालय आणि म्हाडाच्या चकरा मारतोय. मी खासगी नोकरी करणारा माणूस आहे, व्याजाने पैसे आणलेत. एक तर मला माझं घर द्या किंवा १८-२० टक्के व्याजासह माझे पैसे परत करा," अशी आर्त मागणी त्यांनी केली.

अधिकाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
या गंभीर आरोपावर मंत्र्यांनी "तुमची फाईल माझ्यापर्यंत आलीच नाही" किंवा "तुम्ही मला भेटलेच नाही" अशी उत्तरे देत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. यावर घोरपडे यांनी अधिकाऱ्यांकडे फाईल आहे, त्यांना माहिती आहे आणि तुम्हाला देखील मी भेटलेलो देखील आहे, असे सांगितले. तर अधिकाऱ्यांनीही या प्रकरणावर मौन पाळले. अखेर, प्रश्न विचारणाऱ्या घोरपडे यांना सभागृहाच्या बाहेर काढण्यात आले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून म्हाडाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

म्हाडा लॉटरीमध्ये स्वस्तातील घर मिळावे म्हणून लाखो लोक फॉर्म भरतात, त्यापैकी काहींना घर लागते बाकीचे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतात. परंतू, लागलेल्यांनाही घर मिळेल की नाही याची खात्री नसल्याचे समोर येत आहे. कालच्या लॉटरी प्रक्रियेवेळी पाच-सहा वर्षांपूर्वी एका व्यक्तीला घर लागले होते, त्याने म्हाडाला ७० लाख भरले आणि त्याचे घर म्हाडाने दुसऱ्यालाच विकल्याचा प्रकार समोर आणला आले. या व्यक्तीने भर सभेत आवाज उठविताच अधिकारी आम्हाला माहितीच नाही, तुम्ही भेटलाच नाहीत अशी उत्तरे देत होते. 

नितीन घोरपडे यांना २०१९ च्या लॉटरीमध्ये म्हाडाचे घर लागले होते. पुणे म्हाडाकडून मंगळवारी पुण्याची निवडणुकांमुळे रखडलेली लॉटरीची सोडत काढण्यात आली. यावेळी घोरपडे यांनी उभे राहत त्यांच्यासोबत झालेल्या फसवणुकीवर आवाज उठविला. घोरपडे यांच्या दाव्यानुसार त्यांनी या फ्लॅटसाठी सर्व ७० लाख रुपये भरले आहेत. परंतू, त्यांचे घर दुसऱ्यालाच विकण्यात आले आहे. गेली पाच वर्षे ते म्हाडा आणि मंत्रालयाच्या चकरा मारत आहेत. म्हाडाच्या अधिकाऱ्यांना फाईल देत आहेत. परंतू, त्यावर काहीच कारवाई होत नाहीय. यामुळे म्हाडाने मला नुकसान भरपाई द्यावी, अशी उद्विग्न मागणी त्यांनी केली आहे. 

घोरपडे यांच्या प्रश्नांवर मंत्र्यांनी आपल्याकडे फाईलच आलेली नाही, तुम्ही मला भेटलेले नाही, तुम्ही जनता दरबारमध्ये या असे सांगितले. यावर घोरपडे यांनी अधिकाऱ्यांकडे फाईल आहे, त्यांना माहिती आहे आणि तुम्हाला देखील मी भेटलेलो देखील आहे, असे सांगत मला माझा फ्लॅट द्या किंवा १८-२० टक्के व्याजाने माझे पैसे परत करा, मी खासगी नोकरी करतो, कर्ज काढून ते पैसे भरले आहेत, असे सांगितले. 

यानंतर उपस्थित मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना माहिती असेल, तुम्ही लॉटरी झाली की भेटा म्हणत वेळ मारून नेली. तसेच घोरपडे यांना लॉटरी सुरु असलेल्या सभागृहाबाहेर काढण्यात आले. एकंदरीतच म्हाडावर विश्वास ठेवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

म्हाडाने पझेशनचे लेटरही दिले...
घोरपडे यांच्या पत्नीला दोन फ्लॅट लागले होते, एक फ्लॅट परत केला आणि एक घेतला. म्हाडाची रक्कम ५ लाख रुपये भरले. बँकेतून कर्ज काढून, पीएफ काढून, पत्नीचे ११ तोळे सोने बँकेत गहाण ठेवले आणि आम्ही ६० लाख जमवून म्हाडाला भरले. म्हाडाने त्यानंतर पझेशनचे लेटर दिले. नोंदणी कार्यालयात २०२२ च्या सुमारास नोंदणी केली. फ्लॅट ताब्यात घेण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला समजले की त्या फ्लॅटमध्ये त्रयस्थ व्यक्ती कुटुंबासोबत राहत असल्याचे दिसले. त्यांना विचारले असता त्यांनीही म्हाडाकडून फ्लॅट घेतला असल्याचे सांगितले. म्हाडाकडे तक्रार केली तेव्हा त्यांनी असे होऊ शकत नाही असे सांगत होते. नंतर चौकशी केली तेव्हा एकच फ्लॅट दोघांना विकला गेला. त्या व्यक्तीचा लॉटरीशी काहीच संबंध नव्हता, दिनेश नामक व्यक्तीला तो फ्लॅट मी नोंदणी करण्यापूर्वी १५ दिवस आधी विकण्यात आला, असा आरोप घोरपडे यांनी केला. म्हाडाने सांगितले की आमच्याकडून चूक झाली, तुम्हाला घर बदलून देतो. परंतू म्हाडाने काहीच केले नाही. मी सारखा म्हाडा ऑफिसमध्ये जात होतो. मला बसविले जायचे, निघताना अधिकारी सांगायचे मिटिंगला जायचे आहे, असे मला सहा महिने त्रास दिला गेला. मी नंतर म्हाडाच्या बांद्रा येथील व्हिजिलन्स ऑफिसमध्ये तक्रार केली, तिथे अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. त्याचा जबाब घेतला गेला, नजरचुकीने झाल्याचे लिहून दिले, दुरुस्त करू आणि त्यांना फ्लॅट ताब्यात देऊ असे सांगितले आहे. परंतू, आज २०२६ आला तरी फ्लॅट दिलेला नाही. गेली २ वर्षे बँकेचे हप्ते भरत होतो. बँकेला मी सांगितले व हप्ता बंद केला. तेव्हा बँकेने जप्ती आणली परंतू दुसरी व्यक्ती राहत असल्याने बँकेला काही कारवाई करता येत नव्हती. बँक फ्लॅट लिलावात काढणार आहे, म्हाडाला समजले तेव्हा प्रकरणाचा निवाडा करण्याचे त्यांनी बँकेला सांगितले. बँकेने अखेर जप्ती आणली. कॅनरा बँकेचे लोन आहे, त्या व्यक्तीचे एसबीआयचे लोन आहे. एकाच फ्लॅटवर दोन बँकांचे कर्ज आहे, असे घोरपडे यांनी मुंबई तक चॅनलला सांगितले. तसेच म्हाडाच्या या खेट्यांमुळे मला नोकरी गमवावी लागल्याचे ते म्हणाले.  
 

Web Title : MHADA लॉटरी घोटाला: विजेता ने भुगतान किया, अधिकारियों ने घर दूसरे को बेचा!

Web Summary : नितिन घोरपड़े को 2019 में MHADA ने पुणे में एक फ्लैट आवंटित किया, लेकिन पूरा भुगतान करने के बावजूद, इसे किसी और को बेच दिया गया। घोरपड़े ने लॉटरी कार्यक्रम में भ्रष्टाचार का आरोप लगाते हुए विरोध प्रदर्शन किया और अपने फ्लैट या ब्याज सहित धन वापसी की मांग की। अधिकारियों ने जवाबदेही से बचने की कोशिश की।

Web Title : MHADA Lottery Scam: Winner Paid, Officials Sold House to Another!

Web Summary : MHADA allotted a Pune flat to Nitin Ghorpade in 2019, but despite full payment, it was sold to someone else. Ghorpade protested at a lottery event, alleging corruption and demanding his flat or a refund with interest. Officials evaded accountability.