शहरं
Join us  
Trending Stories
1
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
4
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
5
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
6
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
7
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
8
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
9
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
10
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
11
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
12
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
13
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
14
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
15
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
16
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
17
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
18
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
19
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
20
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात आयएएस अधिकारी गजाआड

By admin | Updated: March 20, 2015 01:25 IST

चॉकलेट आणि खाऊच्या आमिषाने शाळकरी मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या मारूती हरी सावंत (५८) यास पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली.

मुलींशी अश्लील चाळे : कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकाचे कृत्यपुणे : चॉकलेट आणि खाऊच्या आमिषाने शाळकरी मुलींना बोलावून त्यांच्याशी अश्लील चाळे करणाऱ्या मारूती हरी सावंत (५८) यास पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. तो भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी असून सध्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचा महासंचालक आहे.सावंतच्या सासऱ्याचा सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक फ्लॅट असून आठवड्यातून दोन दिवस तो या फ्लॅटवर रहाण्यासाठी येत होता. त्याचे कुटुंबीय शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. पोलीसांनी केलेल्या चौकशीनुसार, सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या अल्पयवीन मुलींना सावंत खाऊचे आमिष दाखवून घरात बोलावून त्यांचा गैरफायदा घेत असे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.सावंत याच्या चाळ्यांचा चार विद्यार्थिनींना असह्य त्रास झाला. शाळेत दर मंगळवारी होणाऱ्या समुपदेशन तासात त्यांनी हा सर्व प्रकार शिक्षिकेच्या कानावर घातला. हादरलेल्या या शिक्षिकेने त्वरित ही माहिती मुख्याध्यापिकेला सांगितली. या चार मुली १० ते १२ वर्षांच्या असून दुसरीमधील दोन आणि तिसरी व सातवी इयत्तेतील प्रत्येकी एका मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस तपासासाठी सावंत याच्या फ्लॅटवर गेले असता तो मद्यप्राशन करीत बसला होता,अशी माहिती सहपोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. लैंगिक छळाच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला गुरूवारी रात्री अटक केली. (प्रतिनिधी)च्मारुती सावंत हा मुळचा कोल्हापूरचा असून महसूल सेवेतून बढती मिळून आयएएस केडरमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत जून २०११पासून महासंचालकपदावर कार्यरत आहे. कार्यालयात न येता घरीच फाईल्स मागवून घेत असल्याच्या तक्रारीही त्याच्याबद्दल होत्या. याबद्दल जाब विचारणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला त्याने शिवीगाळ केली होती. त्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता.