शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवार पेठ होर्डिंग अपघात : या एका गोष्टीमुळे जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 19:09 IST

या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती. 

पुणे :कालवा फुटून झालेल्या हानीतून पुणेकर सावरत नाहीत तोच शहरात होर्डिंग कोसळून भीषण अपघात घडला आहे. या अपघातामागील कारणे शोधणे सुरु असताना असे कारण समोर आले की ज्यामुळे अपघात नाही पण जीवितहानी कमी होण्याची शक्यता होती.  

            याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पुण्यातील मंगळवार पेठ भागात होर्डिंगचा सांगाडा कोसळून झालेल्या अपघातात चार  व्यक्तींचा बळी गेला असून सुमारे दहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत. हा अपघात गंभीर तर आहेच पण यंत्रणांच्या दुर्लक्षाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. एकीकडे रेल्वे, खासगी ठेकेदार आणि महापालिकेचे एकमेकांकडे बोट दाखवणे सुरु असताना नागरिकांनीसुद्धा साधा 'झेब्रा क्रॉस'वर उभे न राहण्याचा नियम पाळला असता तर जीवितहानी कमी झाली असती असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

           अधिक विस्ताराने  सांगायचे झाल्यास, पुण्यातील शाहीर अमर शेख चौकात होर्डिंग कोसळून जागेवर दोन व्यक्ती तर उपचारांच्या दरम्यान दोन व्यक्तींचे निधन झाले. अपघात इतका भयंकर होता की घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. या घटनेमागे हलगर्जीपणे होर्डिंग कापणाऱ्यांची चूक आहेच. मात्र सिग्नल सुटल्यावर घाईघाईत पुढे जाण्यासाठी काही गाड्या झेब्रा क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्या आहेत. दुर्दैवाने होर्डिंग झेब्रा क्रोसिंगच्या अधिक जवळ असणाऱ्या गाड्यांवर पडले आणि अपघात घडला. त्यामुळे कदाचित झेब्रा क्रोसिंगच्या मागे गाड्या उभ्या असत्या तर अपघाताची तीव्रता कमी झाली असती. त्यामुळे अशाप्रकारे निष्काळजी होर्डिंग न लावण्याचा आणि लावू देण्याचा धडा प्रशासनाने घेण्याची गरज आहेच. मात्र नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज असल्याचे पुन्हा समोर आले आहे. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातTrafficवाहतूक कोंडीsasoon hospitalससून हॉस्पिटलmangalwar pethमंगळवार पेठ