शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समजून चिमुकल्याने प्यायलं अ‍ॅसिड

By admin | Updated: October 11, 2016 02:51 IST

मीरा रोड येथे राहणाऱ्या राजवीर कन्होजीया (वय ४) या बालकाने पाणी समजून वाहनांच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे सलफ्युरिक अ‍ॅसिड प्यायल्याची

मीरा रोड : मीरा रोड येथे राहणाऱ्या राजवीर कन्होजीया (वय ४) या बालकाने पाणी समजून वाहनांच्या बॅटरीसाठी वापरले जाणारे सलफ्युरिक अ‍ॅसिड प्यायल्याची घटना घडली आहे. राजवीरवर मीरा रोड येथील सध्या वोक्हार्ट रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. राजवीरच्या घरात एका बाटलीबंद पाण्याच्या बाटलीत सलफ्युरिक अ‍ॅसिड होते. तहान लागल्याने राजवीरने पाणी समजून ते प्राशन केले. त्यामुळे त्याच्या पोटात दुखू लागले. तसेच रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने त्याच्या पालकांची धावपळ उडाली. त्याला श्वसनाचा त्रास होऊ लागताच परिसरातील खाजगी रु ग्णालयात दाखल केले. परंतु, त्याची प्रकृती खालावू लागल्याने त्याला डॉक्टरांच्या सल्ल्याने मीरा रोड येथील वोक्हार्ट रु ग्णालयात हलवण्यात आले. त्यात सात तासांचा विलंब झाल्याने राजवीरच्या शरीरातील हिमोग्लोबिन वेगाने घटू लागले. त्यावेळी डॉ. ललित वर्मा यांच्या पथकाने त्वरित राजवीरच्या पोटातील लहान, मोठ्या आतड्यांची एन्डोस्कोपी करण्यास सुरु वात केली. सलफ्युरिक अ‍ॅसिडमुळे त्याच्या पोटातील अवयव निकामी होणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात आली. त्याच्या पोटात रबरी नळी टाकून त्यातील, अ‍ॅसिड बाहेर काढण्यात पथकाला यश आले. अ‍ॅसिडमुळे अन्न नलिका व त्याच्या उगमस्थानापासून इजा झाल्याने अंतर्गत रक्तस्त्राव झाला होता. परंतु, उपचारास आणखी दोन तास उशीर झाला असता, तर त्याची अन्न नलिका कायमस्वरूपी जायबंदी झाली असती. अ‍ॅसिड पोटात गेलेल्या रु ग्णांना भविष्यात आतड्यांचा कर्करोगाची शक्यता असते. त्यामुळे दर तीन वर्षांनी रु ग्णाला एन्डोस्कोपी व १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर बायोप्सी करण्याचा सल्ला दिला जातो, असे डॉ. वर्मा यांनी सांगितले. सध्या राजवीरची प्रकृती स्थिर आहे. मात्र, दर १५ दिवसांनी मात्र त्याच्या पोटाची तपासणी करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)

महत्त्वाचे अवयव होऊ शकतात जायबंदी-कीटनाशके, उंदरांना मारायचे विष, ब्लिचिंग पावडर, सल्फ्युरिक अ‍ॅसिड, पैराफिन (रॉकेल- तेल) अशी तत्सम द्रव्ये उपयोगात येणाऱ्या घरातील कोणत्याही भांड्यांमध्ये अथवा बाटलीत ठेऊ नये. अशा वस्तू व पदार्थ ठेवलेल्या भांड्यांवर स्प्ष्टपणे खूण करून ते बंदिस्त ठेवावेत. विषारी द्रव्ये पोटात गेल्यास मेंदू निकामी होणे, अंधत्व येणे, अर्धा भाग निकामी होणे किंवा आयुष्यभरासाठी महत्त्वाचे अवयव जायबंदी होण्याची शक्यता असते.