शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड, आकुर्डेत शिवाजी महाराजांच्या पाऊलखुणा

By admin | Updated: February 18, 2015 23:43 IST

इतिहासाला उजाळा : मुरगूड शिवकालीन लष्करी ठाणे; पाटगाव मौनी महाराजांचे स्थान

रमेश वारके- बोरवडे =-शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानेच आपल्याला शक्ती मिळते. छत्रपतींची चरणधूळ ज्या भागांना लाभली ते भाग खरोखर पुण्यवान होत. मुरगूड आणि आकुर्डे हा भागही याला अपवाद नाही. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने ही माती पवित्र झाली आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुरगूड आणि आकुर्डेतील स्मृती जपणे ही काळाची गरज आहे. मुरगूड हे शिवकालीन लष्करी ठाणे होते. तर भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथून छत्रपती शिवाजी महाराज हे मौनी महाराजांच्या पाटगाव भेटीला गेले, तो मार्ग आजही विजयमार्ग नावाने ओळखला जातो. रस्त्याच्या दुतर्फा याची आठवण म्हणून व्ही. टी. पाटील यांनी दोन स्तंभ उभे केले आहेत.मुरगूड शिवरायांचे ठाणे होते. या ठाण्याचा ठाणेदार देसाई रुद्राप्पा नाईक यांना आपल्या मुद्रेनिशी महाराजांनी ११ डिसेंबर १६७६ मध्ये मोडी लिपिद्वारे आदेश देऊन शत्रूची ठाणी उठवून आपली ठाणी बसवावी, असे पत्र लिहिले होते. या ऐतिहासिक पत्राच्या तर्जुम्यातून शिवाजी महाराजांचा मुरगूड ठाण्याशी संपर्क होता हे सिद्ध होते. याच अनुषंगाने १६७६ मध्ये महाराजांना गुरुस्थानी असणारे पाटगावचे मौनी महाराज यांच्या भेटीसाठी त्यावेळच्या भौगोलिक परिस्थितीनुसार पाटगावला जाण्याचा जो मार्ग निवडला त्या मार्गानेच मुरगूड ठाण्यातील मार्गाचा समावेश होता. सध्या मुरगूड येथे असलेल्या श्री बिरदेव मंदिराजवळून जाण्याचा मार्ग निवडला. याचा अर्थ या बिरदेव मंदिराच्या परिसरास शिवरायांचा पदस्पर्श झाला आहे.या बिरदेव मंदिराबाबत प्रचलित मौखिक आणि ऐतिहासिक घटनेद्वारे या मंदिराचा जीर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केल्याचे निदर्शनास येते. कारण या मंदिराचे केलेले बांधकाम हे रायगड येथील जगदिश्वर मंदिराच्या बांधकामाशी मिळतेजुळते आहे. सध्या या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने या मंदिराच्या मूळ बांधकामात बदल झाला आहे.भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे आजही आपणास छत्रपतींच्या आठवणींना उजाळा मिळतो. गारगोटी-पाटगाव रस्ता या मार्गाने शिवाजी महाराज हे १६७६ मध्ये योगीराज सद्गुरू मौनी महाराज यांचा आशीर्वाद घेण्यास पाटगावला गेले आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने शिवछत्रपतींनी दक्षिणेत दिग्विजय मिळविला. या पवित्र इतिहासाच्या स्मरणार्थ या मार्गास विजयमार्ग नावाने संबोधले जाते. म्हणूनच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या या स्मृती जपून त्याची आणखीन नवीन माहिती उजेडात यावी ही काळाची गरज आहे.‘मुरगूडच्या देसाई रुद्राप्पा नाईक यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलेले पत्र तसेच येथे असलेल्या बिरदेव मंदिराच्या प्रचलित ऐतिहासिक व मौखिक घटनांच्या आधारावर महाराजांनी पाटगावला जाण्यासाठी या मार्गांचा वापर केल्याने हा परिसर शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. नाईक यांंना पाठविलेले पत्र व छत्रपती आणि मौनी महाराज भेट हे साल १६७६ आहे. त्यामुळे महाराजांच्या या ठिकाणी संपर्क होता हे सिद्ध होते.’- एम. डी. रावण (मुरगूड), व्ही. डी. पाटील (आकुर्डे), इतिहास अभ्यासकआकुर्डे येथून ज्या मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज हे मौनी महाराज यांच्या भेटीसाठी गेले, त्याची स्मृती म्हणून या मार्गावर दोन्ही बाजूस व्ही. टी. पाटील यांनी स्तंभ उभे केले आहेत. यास विजयमार्ग म्हणूनही ओळखले जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरगूडचे देसाई नाईक यांना पाठविलेल्या पत्राची प्रत.