शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांच्या जाहीरनाम्यात हवे भाषेचे अभिवचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:17 IST

येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, अशी मागणी करण्यात आली आहे

ठळक मुद्देपक्षनेतृत्वांना पत्र : महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचा पुढाकार

पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात, वचननाम्यात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे अभिवचन देणे बंधनकारक असावे, त्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी, अशी मागणी महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. भाषेच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करणारे पक्ष आणि उमेदवारांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन भाषाप्रेमींना करण्यात आले आहे. आपापल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशी अभिवचने दिली जातील, असा आग्रह पक्ष नेतृत्वाने धरावा आणि मराठीच्या व्यापक हितासाठी हे पाऊल उचलावे, याबाबत पत्रव्यवहार करण्यात आल्याचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी सांगितले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे आदींना ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे.मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी संबंधित मागण्या आणि प्रश्नांबाबत शासन दरबारी कायमच उदासीनता पाहायला मिळते. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही या प्रश्नांना कायम बगल दिली जाते. भाषेशी संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी २४ जूनला साहित्यिकांनी मुंबईत धरणे आंदोलन केले. यावेळी हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. आश्वासनांची पूर्तता व्हावी, यासाठी या प्रश्नांकडे जाहीरनाम्यपासूनच लक्ष केंद्रित करायला हवे, असे मत व्यक्त केले जात आहे................

* मराठी शाळा पुन्हा सुरू करणार भाषेचे जतन, संवर्धनावर अंदाजपत्रकाच्या किती टक्के रक्कम खर्च करणार, मराठी माध्यमांच्या बंद पडलेल्या शाळा सुरू करून त्या पुन्हा बंद न पडण्याची काळजी घेणार, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी पूर्ण राजकीय बळ उभे करणार, मराठी विद्यापीठ त्वरित स्थापन करणार, बारावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करणार, त्यासाठी तमीळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगालीप्रमाणे मराठी भाषा शिक्षण कायदा करणार, मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापणार, राज्य आणि विभागीय सांस्कृतिक विकास महामंडळांची स्थापना करणार, एवढ्या किमान बाबींची अभिवचने नि:संदिग्धपणे देणे व मराठी भाषिक समाजाने ती मागणे अतीव गरजेचे झाले आहे. असे करणारे पक्ष आणि उमेदवारांचाच मतदारांनी विचार करावा, अशी मोहीम लवकरच साहित्य, संस्कृती क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती आणि संस्थांतर्फे  हाती घेतली जाणार आहे........

आपल्या भागातील सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, पक्ष प्रवक्ते यांनी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यात अशी अभिवचने द्यावीत, असा आग्रह आपण धरला पाहिजे. यासाठी भाषाप्रेमी, साहित्यिक अशा सर्व घटकांनी एकत्र आले पाहिजे. - डॉ. श्रीपाद जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी........... 

टॅग्स :Puneपुणेcongressकाँग्रेसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसMNSमनसेmarathiमराठी