शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आंबेडकर भवनात प्रवेशास प्रकाश आंबेडकरांना मज्जाव

By admin | Updated: July 30, 2016 05:48 IST

दादर येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने

मुंबई : दादर येथील जमीनदोस्त करण्यात आलेल्या ऐतिहासिक आंबेडकर भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश करण्यास शुक्रवारी उच्च न्यायालयाने मज्जाव केला. जबरदस्तीने या भवनात कोणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितावर थेट कारवाई करावी, असा आदेश पोलीस आयुक्तांना देत उच्च न्यायालयाने सोमवारपर्यंत हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचेही निर्देश दिले. रातोरात आंबेडकर भवन पाडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या समर्थकांना ३० जुलै रोजी श्रमदान करून पुन्हा एकदा आंबेडकर भवन उभारणार असे सांगितले. त्यामुळे पीपल इम्प्रुव्हमेंट ट्रस्टने उच्च न्यायालयात केलेल्या अर्जावर न्या. एस. जे. काथावाला यांच्यापुढे सुनावणी होती.ट्रस्टने केलेल्या अर्जानुसार, आंबेडकर भवनाच्या आवारात असलेली तीन बांधकामे मोडकळीस आल्याने ती पाडण्यात यावीत, अशा आशयाची नोटीस महापालिकेने १ जून रोजी ट्रस्टला बजावली. महापालिकेने बजावलेल्या नोटीसनुसार, ट्रस्टने २५ जून रोजी आंबेडकर भवन पाडण्याचे काम सुरू केले. मात्र त्याच दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थक प्रकाश आंबेडकरांसह भवनात शिरले आणि याच वेळी प्रकाश आंबेडकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समर्थकांना ३० जुलै रोजी एकत्र येऊन श्रमदान करून पुन्हा आंबेडकर भवन उभारण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्याचे निर्देश‘या प्रकरणावरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत कोणीही येथे (भवनात) काहीही करू नये. हे बांधकाम ‘जैसे थे’ स्थितीत ठेवण्यात यावे,’ असे निर्देश न्या. काथावाला यांनी दिले. ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, आंबेडकर भवनात तीन बांधकामे होती. ही तिन्ही बांधकामे पाडण्यात आली आहेत. त्यापैकी एका बांधकामाचे मालक प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर आहेत. प्रस्तावित १७ मजली बांधकामामध्ये प्रकाश आणि आनंदराज आंबेडकर यांना कामकाज करण्याची परवानगी दिली जाईल, असेही ट्रस्टने स्पष्ट केले.