शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
5
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
6
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
7
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
8
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
9
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
10
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
11
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
12
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
13
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

आजपासून राज्यभरातील प्राध्यापक बेमुदत संपावर; 25 हजार प्राध्यापकांचा सहभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 7:39 AM

विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचा संप

मुंबई: राज्यभरातील वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विविध मागण्यांसाठी आजपासून संपावर आहेत. प्राध्यापकांच्या एमफुक्टो संघटनेनं पुकारलेल्या या संपात 25 हजार प्राध्यापकांचा सहभाग आहे. महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचं मानधन वाढवावं, अभ्यास मंडळांमधील नियुक्त्यांमध्ये झालेला गोंधळ दूर करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, थकीत ७१ दिवसांचं वेतन मिळावं या मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.प्राध्यापकांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर काल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बैठक होणार आहे. राज्यभरातील प्राध्यापकांच्या समस्या सोडवण्याबद्दल या बैठकीत चर्चा होईल. यासाठी प्रमुख संघटनांना बोलावण्यात आलं असलं, तरी बेमुदत संपावर ठाम असल्याची माहिती एमफुक्टोचे मधू परांजपे यांनी दिली. एमफुक्टो संघटनेच्यावतीनं त्यांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. याआधी संघटनेकडून राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली होती. याशिवाय ११ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा संपदेखील करण्यात आला होता. मात्र या आंदोलनाची शासनानं काहीच दखल न घेतल्यानं त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला. शहरातील सर्व महाविद्यालयांमधील प्राध्यापक यामध्ये मोठया संख्येनं सहभागी होणार असल्याची माहिती पुटाचे (पुणे युनिव्हसिटी टिचर्स असोसिएशन) अध्यक्ष एस. एम. राठोड यांनी दिली. दरम्यान यापूर्वी संघटनेनं ७१ दिवसांचा बेमुदत संप केला होता, त्यावेळी त्याला कमी पाठिंबा मिळाला होता. त्याचबरोबर शासनाने त्या ७१ दिवसांचे वेतन प्राध्यापकांना दिलं नव्हतं. त्यामुळे काही प्राध्यापक या आंदोलनापासून दूर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.   

टॅग्स :Professorप्राध्यापकMaharashtraमहाराष्ट्र