शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

लिंबूवर्गीय फळांचे उत्पादन २० टनावर नेणार - डॉ. लदानिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 02:40 IST

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही सदैव तयार

- गोपालकृष्ण मांडवकरनागपूर : लिंबूवर्गीय फळपिकांमध्ये देशाची उत्पादकता २५ वर्षांपूर्वी ६ ते ७ प्रति हेक्टर टन होती. आज ती १२ ते १३ प्रति हेक्टर टनावर पोहचली असली तरी ती आम्हाला २० टन प्रति हेक्टरवर न्यायची आहे, असा विश्वास केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एम.एस. लदानिया यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये व्यक्त केला.देशात एकमेव असलेल्या नागपुरातील केंद्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन संस्थेच्या यशाबद्दल डॉ. लदानिया म्हणाले, लिंबूवर्गीय फळपिकांच्या निर्यातीमध्ये आज चीन पहिल्या तर ब्राझील दुसºया तर भारत तिसºया स्थानावर आहे. दरवर्षी ८० ते ९० हजार टन लिंबूवर्गीय फळपिकांची निर्यात भारतामधून होते. भविष्यात वाढलेल्या उत्पादकतेमधून हे चित्र बदलेले असेल.रोगमुक्त आणि कमी खर्चात अधिक उत्पादकतेच्या कलमा देणे व त्यातून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे हा आमचा हेतू आहे. त्यासाठी नव्या प्रजाती शोधून त्या स्थानिक वातावरणामध्ये विकसित करण्यासाठी आमचे संशोधन सातत्याने सुरू असते. मागील पाच वर्षात संस्थेने १७ लाख रोगमुक्त कलमा दिल्या. त्याची परिणती आता वाढलेल्या उत्पादकतेमध्ये दिसत आहे.उत्पादकता वाढीसाढी नवे तंत्रज्ञान वापरत असल्याचे सांगून डॉ. लदानिया म्हणाले, सध्या एका हेक्टरमध्ये २७७ झाडे लावली जातात. यापुढे नव्या तंत्रातून ७०० ते ८०० झाले लावली जातील. ६ बाय ६ ऐवजी ६ बाय ३ असे अंतर राहील. ६ वर्षापूर्वी संशोधन केंद्रात केलेला हा प्रयोग आता यशस्वी ठरला आहे. शुट-टिप-ड्राफ्टिंग हे तंत्र वापरून मातृवृक्ष रोगमुक्त करण्याचे विशेष संशोधन संस्थेने केले आहे.१५ वर्षातील संशोधन : मागील १५ वर्षात केंद्रातून मोसंबी, संत्रा, लिंबूच्या अनेक प्रजाती संशोधित होऊन वितरित झाल्या. डिंक्या रोगाला प्रतिकारक असलेली अलिमाऊ संत्रा ही प्रजाती २०१२-१३ मध्ये संशोधित झाली. लिंबूमध्ये एनआरसीसी-७, एनआरसीसी-८, यासह ९ प्रजाती संशोधित व वितरित झाल्या.कमी बियांच्या तीन संत्रा जाती एनआरसीसी सीडलेस-४, मोसंबीमध्ये कटर व्हॅलेन्सिया, पमोलोमध्ये एनआरसीसी-५ यासह विविध प्रकारच्या ६१५ प्रजातींचे संशोधन झाले आहे. मोसंंबीमध्ये चार तसेच संत्रामध्ये दोन प्रजाती विकसित झाल्या.