कॅप्टन खरात प्रकरणी अडचणी वाढल्या, रूपाली चाकणकर फरार? महिला नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 13:21 IST2026-03-20T13:16:12+5:302026-03-20T13:21:03+5:30

Rupali Chakankar News: महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अनुयायी असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर ह्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.

Problems increase in Captain Ashok Kharat case, Rupali Chakankar absconding? Claims a female leader Rupali Patil Thombare | कॅप्टन खरात प्रकरणी अडचणी वाढल्या, रूपाली चाकणकर फरार? महिला नेत्याचा दावा

कॅप्टन खरात प्रकरणी अडचणी वाढल्या, रूपाली चाकणकर फरार? महिला नेत्याचा दावा

महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अनुयायी असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर ह्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. दरम्यान, खरात प्रकरणात गंभीर आरोप झाल्यानंतर रूपालीताई चाकणकर ह्या फरार झाल्या असल्याचा दावा रूपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे.

या संदर्भात रूपाली पाटील-ठोंबरे यांनी समाज माध्यमांवर एक संक्षिप्त पोस्ट केली आहे. ‘राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर फरार. बजाव टाली’, अशी सूचक पोस्ट रूपाली पाटील-ठोंबरे यांनी केली आहे. तसेच त्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली होती. 

Web Title : कैप्टन खरात मामला: रूपाली चाकणकर मुश्किल में, फरार?

Web Summary : गिरफ्तार ज्योतिषी खरात से संबंध के चलते रूपाली चाकणकर मुश्किलों में। रूपाली पाटिल ठोंबरे का दावा है कि गंभीर आरोपों के बाद चाकणकर फरार हैं। पुलिस ने खरात को एक महिला को नशीला पदार्थ देकर हमला करने के आरोप में गिरफ्तार किया।

Web Title : Captain Kharat Case: Rupali Chakankar in Trouble, Absconding?

Web Summary : Rupali Chakankar faces heat over links to arrested astrologer Kharat. Rupali Patil Thombre claims Chakankar is absconding after serious allegations surfaced. Police arrested Kharat for allegedly drugging and assaulting a woman.