शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

पृथ्वीराज चव्हाणांच्या विधानात तथ्य असू शकतं; भाजपाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 10:25 IST

शिवसेनेने यावेळीच नाही, तर 2014मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपानंही या सर्व प्रकरणावरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. त्यावेळी चर्चा होती, पण या तीन पक्षांची खिचडी पकली नाही. आता ती खिचडी पकली.

मुंबईः शिवसेनेने यावेळीच नाही, तर 2014मध्येसुद्धा भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाआघाडी करून सत्तास्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आले. पृथ्वीराज चव्हाणांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. भाजपानंही या सर्व प्रकरणावरून पुन्हा एकदा शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत जबाबदार आणि मोजून मापून बोलणारी व्यक्ती आहेत. आपण काय बोलतो आहोत याचं त्यांना नीट भान असतं. उचलली जीभ लावली टाळ्याला हा प्रकार त्यांच्या बाबतीत होत नाही. ते जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतात ते गंभीरपणेच घेतलं पाहिजे, असं भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी म्हणाले आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीकडे त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.  2014च्या विधानसभा निवडणुकांच्या नंतरच्या घडामोडी मलासुद्धा बऱ्यापैकी माहीत आहेत. त्यांच्या विधानामध्ये तथ्य असू शकतं एवढंच मी सांगतो. त्यावेळी चर्चा होती, पण या तीन पक्षांची खिचडी पकली नाही. आता ती खिचडी पकली.संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की लोकसभा निवडणुकांच्या आधीपासून आम्ही चर्चा करत होतो. त्यामुळे रोज बोलणाऱ्या संजय राऊतांचं विधान आणि कमी बोलणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांचं विधान एकमेकांना पूरक आहे. आम्ही मैत्री आणि श्रद्धेवर विश्वास ठेवतो, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता, असंही राष्ट्रवादीच्या नवाब मलिकांनी स्पष्ट केलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती उघड केली होती. भाजपाविरोधात निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने विरोधी पक्षाची भूमिका स्वीकारली होती. त्यावेळीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव दिला होता. तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन राज्यात सरकार स्थापन करून भाजपाला सत्तेतून दूर करावे, असा प्रस्ताव होता. मात्र हा प्रस्ताव मी फेटाळून लावला होता.'' 2014 नंतर परिस्थिती खूप बदलली आहे. भाजपाने मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली. एकहाती सत्ता मिळावी व विरोधी पक्ष संपावेत यासाठी भाजपाने प्रयत्न केले. अशा परिस्थिती भाजपाकडे पुन्हा सत्ता गेली असती तर राज्यातील लोकशाही संपुष्टात आली असती. म्हणूनच मी  पर्याची सरकारची कल्पना मांडली. तसेच भाजपा आणि शिवसेनेत तीव्र मतभेद झाल्यावर ते प्रत्यक्षात यावे यासाठी पुढाकार घेतला. माझ्या या कल्पनेला सुरुवातीला विरोध झाला. मात्र मी आग्रह कायम ठेवला. सर्व आमदारांशी बोललो. अल्पसंख्याक नेत्यांशी चर्चा केली. भाजपा आपला नंबर एकचा शत्रू आहे आणि त्याला रोखणे गरजेचे आहे हे सर्वांना पटवून दिले, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.  

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीBJPभाजपा