शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

येरवडा कारागृहातून कैदी पसार

By admin | Updated: July 15, 2015 02:30 IST

जेलमधून सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले असताना किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला खुल्या कारागृहातून पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली

पुणे : जेलमधून सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले असताना किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला खुल्या कारागृहातून पळून जाण्याची दुर्बुद्धी झाली. तो पकडला गेल्यास पळून जाण्याच्या शिक्षेपेक्षा जास्त, दोन वर्षांची शिक्षा त्याला होऊ शकेल. आज दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार झाला. राम गजानन जाधव (वय ३०, सुगाव, पोस्ट कुंबेफळ, ता. अकोले, जि. नगर) असे त्याचे नाव आहे. तो सहा महिन्यांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. त्याचा बंदी क्रमांक ३७७७५ असा आहे.कारागृहातील मुख्य बागेत, तटाजवळ साफसफाईचे काम करीत असताना तो कारागृहरक्षकाची नजर चुकवून पसार झाला. कारागृहाचे हवालदार एस. माळसकर यांनी याबाबत येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद केली. याबाबत तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक मधुकर साळुंके म्हणाले, की जाधव किरकोळ चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत होता. सुटका होण्यासाठी ८ ते १० दिवस राहिले होते. त्याचा शोध सुरू असून त्याच्यावर कायदेशीर रखवालीतून पळून जाण्याचा नवा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात त्यास दोन वर्षांची शिक्षा होऊ शकेल. (प्रतिनिधी)