दुःखद! मंदिरात पूजेची तयारी करतानाच पुजाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 15:49 IST2021-10-07T15:48:47+5:302021-10-07T15:49:06+5:30
घटस्थापनेच्या दिवशीच घडलेल्या घटनेने कागल तालुक्यात हळहळ

दुःखद! मंदिरात पूजेची तयारी करतानाच पुजाऱ्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
कागल : बोरवडे ( ता. कागल ) येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग मंदीरातील मुख्य पुजारी जोतिराम शामराव गुरव ( वय ४२ ) यांचे मंदिरात पुजेची तयारी करतानाच ह्लदयविकाराच्या धक्क्याने गुरुवारी पहाटे निधन झाले. ऐन दसऱ्याच्या तोंडावरच घटस्थापनेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बोरवडेचा दसरा महोत्सव परिसरात मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. आज घटस्थापनेच्यादिवशी पहाटे सहा वाजता जोतिर्लिंग मंदीरात जोतिराम गुरव पुजेची तयारी करत होते. यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. शांत व मनमिळावू स्वभावाच्या जोतिराम यांनी ग्रामस्थांत आदराचे स्थान मिळवले होते.