भाजयुमो मुंबई अध्यक्षावर हल्ला

By Admin | Updated: August 11, 2015 02:13 IST2015-08-11T02:13:10+5:302015-08-11T02:13:10+5:30

भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या कारवर सोमवारी काही अज्ञात इसमांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले असून, त्यांना दुखापत झाली आहे.

President of BJYM Mumbai attacked | भाजयुमो मुंबई अध्यक्षावर हल्ला

भाजयुमो मुंबई अध्यक्षावर हल्ला

मुंबई : भाजपा युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष गणेश पांडे यांच्या कारवर सोमवारी काही अज्ञात इसमांनी हल्ला केला. यामध्ये त्यांच्या कारचे नुकसान झाले असून, त्यांना दुखापत झाली आहे. हा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे. याबाबत धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
काँग्रेसचे गुरुदास कामत यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना ‘कामवाली बाई’ असे संबोधले होते. भाजपा कार्यकर्त्यांनी कामत यांच्या घरावर धडक मोर्चा काढला होता. या वादातून हा हल्ला केल्याचा आरोप पांडे यांनी केला.

Web Title: President of BJYM Mumbai attacked